लातूर जिल्ह्याला तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जिल्ह्यात जोरदार बॅटिंग केली. निलंगा तालुक्यातील अनेक गावांना या पावसाचा फटका बसला आहे. तगरखेड येथे विज पडुन गोरोबा रामा सुयॅवंशी यांचे निधन झाले आहे तर औराद येथील सुभाष किशन देशमुख (वय 32 वर्षे) यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.
2/5
कमी कालावधीत झालेल्या पावसामुळे ओढे भरून वाहत होते. अनेक झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला आहे. निलंगा तालुक्यातील चन्नाचीवाडी, माकणी थोर, सावरी शिवारात अवकाळी पावसाचा जोर जास्त होता. ह्या भागातील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. निलंगा तालुक्यातील चन्नाचीवाडी येथील शेतकरी माणिक अंचुळे यांच्या शेतात उभे केलेले तीन एकर जमिनीवरील गुलाबाचे शेड नेट वाऱ्याच्या तडाख्यात उडून गेलं आहे. कर्नाटका भागातील भालकी तालुक्यातील इचुर येथेही विज पडून शेळ्या दगावल्या आहेत.
3/5
लातूर जिल्ह्यातील निलंगा देवनी औराद ह्या भागात पावसाने सलग तिसऱ्या दिवशी हजेरी लावली आहे.
4/5
काही महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळे याच भागात मोठे नुकसान केले होते. सतत नुकसानीचा सामना या भागातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
5/5
या तीन दिवसांच्या पावसाने जनावराचा चारा नष्ट केलाय. भाजीपाल्याच्या शेतीलाही फटका बसला आहे. आंबा गळून पडत आहे, जनावरे विज पडल्यामुळे दगावत आहेत. आतातर मनुष्यहानीही झाली आहे. कोरोनामुळे शेतमालस उठाव नाही, त्यात हे आस्मानी संकट आले आहे.