लोणार सरोवराच्या जवळच असलेला आडवा माळ या परिसरात अति दुर्मिळ जातीचा गिधाड (Egyptian vulture) आढळला आहे.
2/4
गिधाडे संकटग्रस्त प्रजातींच्या यादीमध्ये आहे, लोणार परिसरात अतिशय दुर्मिळ जातीचा गिधाड आढळून आल्याने पक्षी प्रेमींना आनंद झाला आहे.
3/4
गेल्या 5 वर्षांपासून मी लोणारकर या पक्षीप्रेमी टीमने असा पक्षी दिसल्यास माहिती द्यावी असे आवाहनही केले होते.जेणेकरून त्याच्या अधिवासाची माहिती BNHS व वनविभागास देता येईल. संबंधितांना संवर्धनासाठी आवश्यक पाऊले उचलता येतील लोणारच्या जवळच या पक्ष्याची नोंद झाल्याने पक्षीमित्रांमध्ये समाधानाची भावना आहे.
4/4
मी लोणारकर या परिवाराने याबाबत वन विभागास कळवलं असून त्यांनी दखल घेत संवर्धनाची हमी घेतली आहे.