एक्स्प्लोर
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... आषाढीपूर्वी राज्यातील 2 हजार सायकलस्वारांची 'सायकल वारी'
Pandharpur Cycle Wari : मागील दोन वर्षांपासून पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीनं ही सायकल वारीची संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यंदा राज्यातील 39 गावातील दोन हजार सायकल वारकरी दाखल झाले होते.
Ashadhi Wari 2023 | Pandharpur Cycle Wari
1/9

आषाढी पूर्वी राज्यातील 2 हजार सायकलस्वारानी आज सायकल वारी काढली. यावेळी त्यांनी नगर प्रदक्षिणा करून रिंगण सोहळाही केला.
2/9

राज्यातील 39 गावांमधून आज 2 हजार सायकल स्वारांनी सायकल वारी करत विठुनामाचा जयघोष केला.
3/9

आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. अशातच पंढरपुरात मात्र अनोखी सायकल वारी काढण्यात आली.
4/9

मागील दोन वर्षांपासून पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीनं ही सायकल वारीची संकल्पना सुरू करण्यात आली आहे.
5/9

यंदा राज्यातील 39 गावातील दोन हजार सायकल वारकरी दाखल झाले होते.
6/9

पंढरपूर सायकलर्स क्लबचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून पायी-वारी या धर्तीवर सायकल वारी हा उपक्रम राबवला जात आहे.
7/9

आज पहाटे सहा वाजता या सायकलपटूंनी शहराला नगरप्रदक्षिणा करत सायकल दिंडी काढली.
8/9

यानंतर शहरातील रेल्वे मैदानावर सायकल वरून रिंगण सोहळा करत आपली सायकल वारी पूर्ण केली.
9/9

सायकलवारीमध्ये पंढरपूरसह बालाघाट, बुलढाणा, दवडाई, गंगाखेड, इचलकरंजी, कोल्हापूर, कुर्डूवाडी, कोरेगाव कुपवाड, लातूर, मालेगाव, माढा नाशिक, परभणी, फलटण, पलूस, सोलापूर, संभाजीनगर, सांगली, श्रीपूर, उंब्रज, मोरगाव, बारामती आदी ठिकाणांहून सायकल वारकरी दाखल झाले होते.
Published at : 11 Jun 2023 11:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
आरोग्य
मुंबई
व्यापार-उद्योग



















