Chandrababu Naidu News: रेवंथ रेड्डींच्या हाॅटलाईनवरून चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; माजी मुख्यमंत्र्यांचा सनसनाटी दावा!
Chandrababu Naidu News: विशेष म्हणजे भाजपकडे बहुमत नसल्याने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.

Chandrababu Naidu News: वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आंध्र प्रदेशातील मतदानातील तफावतींबद्दल चर्चा टाळल्याबद्दल जोरदार टीका केली. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. विशेष म्हणजे भाजपकडे बहुमत नसल्याने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी मत चोरी करून तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. 100 हून अधिक जागांवर भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने घोटाळा केल्याचा सुद्धा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल का बोलत नाहीत?
दरम्यान, निवडणूक समस्या सोडवण्यासाठी गांधींच्या निवडक दृष्टिकोनावर रेड्डी यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल का बोलत नाहीत? केजरीवाल स्वतः आमदारकीची निवडणूक हरले. राहुल गांधी आंध्रबद्दल बोलत नाहीत, कारण चंद्राबाबू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत हॉटलाइनद्वारे त्यांच्याशी संपर्कात आहेत. तर, राहुल गांधींबद्दल मी काय बोलावे, जे स्वतः प्रामाणिक नाहीत?, अशी टीका रेड्डी यांनी केली. आंध्र प्रदेशातील मतमोजणीमधील तफावतीवर रेड्डी यांनी विशेष भर दिला.
#WATCH | Amaravati, Andhra Pradesh: YSRCP chief YS Jagan Mohan Reddy says, "...Chandrababu Naidu is in touch with Rahul Gandhi through Revanth Reddy on a hotline."
— ANI (@ANI) August 13, 2025
He also says, "When Rahul Gandhi talks about vote-chori, why does he not make a statement on Andhra, where the… pic.twitter.com/amysMjKT6Q
12.50 टक्के मतांच्या फरकाबद्दल ते का बोलत नाहीत?
राहुल गांधी दिल्लीत असताना मत चोरीबद्दल बोलतात. आंध्र प्रदेशात जाहीर झालेल्या आणि मोजलेल्या मतांमधील 12.50 टक्के मतांच्या फरकाबद्दल ते का बोलत नाहीत? फरक 2.5 टक्के होता, असे त्यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी X प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये निवडणूक प्रक्रियेवर टीका करण्यात आली होती. व्हिडिओमध्ये भाजपचे दोन व्यक्ती बनावट मते टाकण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी सहकार्य करत असल्याचे दाखवण्यात आले होते. व्हिडिओमध्ये बनावट मते टाकल्यानंतर हे व्यक्ती मतदान केंद्र सोडताना दाखवण्यात आले होते, त्यापैकी एक जण म्हणत होता, ही खूप चांगली व्यवस्था आहे, आता विजय निश्चित आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























