एक्स्प्लोर
PHOTO: दारुचा महापूर! सोलापुरात 5 हजार लीटर हातभट्टी जप्त, लाखोंचा मुद्देमाल पकडला
सोलापूरमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळात 5 हजार लीटर हातभट्टी दारु पकडण्यात आलीय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावातून हातभट्टी दारु हस्तगत करण्यात आलीय.
liquor seized in Solapur
1/10

सोलापूरमध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळात 5 हजार लीटर हातभट्टी दारु पकडण्यात आलीय.
2/10

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावातून हातभट्टी दारु हस्तगत करण्यात आलीय.
3/10

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही धडाकेबाज कारवाई केलीय.
4/10

यामध्ये एकूण 3 लाख 60 हजाराचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय.
5/10

सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात छापा टाकला.
6/10

यामध्ये तब्बल 5 हजार 165 लिटर हातभट्टी दारू आणि 1 टन 110 किलो गुळ पावडर आढळून आली.
7/10

तसेच या ठिकाणावरुन 4 रिकामे प्लास्टिक बॅरल, 20 रिकाम्या रबरी ट्यूब, 1 मोबाईल, 1 मोटरसायकल असा एकूण 3 लाख 59 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
8/10

आरोपी भिमराव काशिनाथ राठोड यास जागीच अटक करण्यात आली आहे.
9/10

त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय.
10/10

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूर अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
Published at : 03 Sep 2022 07:29 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण




















