एक्स्प्लोर
Kirit Somaiya kolhapur : हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्या कोल्हापुरात; करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे घेतले दर्शन
Kirit Somaiya : हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेसने किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
Kirit Somaiya kolhapur
1/10

भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
2/10

हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी झाल्यानंतर पाच दिवसांमध्येच किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत
3/10

मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या दौऱ्याला कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, असे आवाहन केलं आहे.
4/10

महालक्ष्मी एक्स्प्रेसने किरीट सोमय्या यांचे कोल्हापुरात आगमन झाले.
5/10

रेल्वे स्थानकावर त्यांनी पोहोचताच माध्यमांशी संवाद साधला.
6/10

ते म्हणाले की, काही मंत्र्यांवर कारवाई झाली आहे, काहींवर होत आहे, म्हणून शक्ती मागण्यासाठी आलो आहे.
7/10

कारवाई झाल्यानंतर हसन मुश्रीफांना धर्म आठवला. मात्र, आता कारवाई सुरु झाली असल्याचे ते म्हणाले.
8/10

मोदी सरकारवर कोणी घोटाळेबाज दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणी प्रभाव पाडू शकत नसल्याचे सोमय्या म्हणाले.
9/10

हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या छापेमारीनंतर गेल्या पाच दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
10/10

मुश्रीफ यांनी रविवारी थेट व्हिडिओ व्हायरल करत छापेमारी किती मोठे षड्यंत्र होते, याचा हा धडधडीत पुरावा असल्याचे म्हटले आहे.
Published at : 16 Jan 2023 11:01 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























