एक्स्प्लोर
अहमदनगरची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरी; कोल्हापूरच्या अमृताला उपविजेतेपद
Mahila Maharashtra Kesari : भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात स्पर्धा झाली.

Mahila Maharashtra Kesari
1/10

कोल्हापुरात झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली.
2/10

कोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले.
3/10

भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात स्पर्धा झाली.
4/10

उपांत्य फेरीत भाग्यश्री विरुद्ध सांगलीची प्रतीक्षा बागडी यांच्यात लढत झाली.
5/10

उपांत्य फेरीत अमृताची कोल्हापूरच्याच वैष्णवी कुशाप्पाशी झाली. ही लढत अमृताने जिंकली.
6/10

विजेत्या भाग्यश्रीला पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भाग्यश्रीला चांदीची गदा व चारचाकीची किल्ली सुपूर्द करण्यात आली.
7/10

प्रत्येक वजनगटातील विजेत्या पैलवानांना दुचाकी प्रदान करण्यात आली.
8/10

दीपाली भोसले-सय्यद यांनी पुढील हिंदकेसरी ठाण्यात घेणार असल्याचे सांगितले.
9/10

तीनवेळा महाराष्ट्र केसरी विजेत्यांना क्लास वन नोकरी द्या, अशी मागणी त्यांनी केली.
10/10

दरम्यान, या स्पर्धेसाठी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांना निमंत्रित केल्याने कुस्ती पंढरीतील रणरागिणींचा कडाडून विरोध केला होता. त्यामुळे बृजभूषण सिंह कोल्हापुरात आलेच नाहीत.
Published at : 28 Apr 2023 10:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
क्राईम
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
