देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) पावसाचा जोर अधिक आहे.
2/9
पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही देशाच्या राजधानीसह विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
3/9
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
4/9
हिमाचल प्रदेशमध्येही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 12 पैकी आठ जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
5/9
तेलंगणा, मराठवाडा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, अंतर्गत कर्नाटक, केरळमध्ये हलका पाऊस पडू शकतो.
6/9
मध्य प्रदेशातही 15 ऑगस्टपासून मान्सून सक्रीय झाला झाला आहे.त्यामुळं तिथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
7/9
छत्तीसगडमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
8/9
उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून, त्यामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
9/9
राज्यात होत असलेल्या भूस्खलनामुळं अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर अनेक ठिकाणी शेती पिकांना देखील फटका बसला आहे.