एक्स्प्लोर
PM Modi: पंतप्रधान मोदींची जंगल सफारी, पाहा खास फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (9 एप्रिल) कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर आहेत. त्यांनी जंगल सफारी केली.
PM Narendra Modi
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज ते जंगल सफारी करत असल्याचे पाहायला मिळालं.
2/10

कर्नाटकमधील निसर्गरम्य बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. यावेळी तयांनी तेथील वन्यजीवांची पाहणी देखील केली.
3/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेची झलक पाहिली.
4/10

म्हैसूरमधील 'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
5/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जंगल सफारीसाठी खास लूक केला आहे
6/10

कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत पंतप्रधान मोदींनी छायाचित्रे देखील काढल्याचे पाहायला मिळालं.
7/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन केलं जाणार आहे.
8/10

पंतप्रधान व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधला.
9/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकमधल्या बंदीपूर अभयारण्याला भेट देत आहेत. 1973 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात सुरु झालेल्या प्रोजेक्ट टायगरला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
10/10

कर्नाटक दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील थेप्पाकडू येथील हत्तींच्या छावणीला भेट दिली.
Published at : 09 Apr 2023 12:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























