एक्स्प्लोर
Delhi: दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलक कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये राडा; नेमकं कशामुळे झाली बाचाबाची?
Delhi: दिल्लीत जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटू धरणे आंदोलनाला बसले आहेत. काल रात्री या कुस्तीपटूंमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या गोंधळात काही कुस्तीपटू जखमी झाले.
Late night chaos between Wrestler Protesters and Delhi Police
1/23

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचे गेल्या आठवड्याभरापासून दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणेला बसलेल्या कुस्तीपटूंची काल रात्री दिल्ली पोलिसांशी जोरदार झटापट झाली.
2/23

काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यात वादावादी आणि हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
3/23

पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.
4/23

जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान, आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती हे धरणेवर बसलेल्या कुस्तीपटूंना झोपण्यासाठी फोल्डिंगच्या खाटा घेऊन जंतरमंतरवर पोहोचले, तिथे पोलिसांनी त्यांना अडवले.
5/23

प्रकरण वाढताच वादावादीला सुरुवात झाली, या वादात पैलवानही अडकले. पोलिसांनी सोमनाथ भारती यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थकही तेथे जमा झाले.
6/23

पोलिसांची कुस्तीपटूंशी झटापट झाली आणि काही पैलवानांना दुखापत झाली. त्यात विनेश फोगटचा चुलत भाऊ दुष्यंत फोगट याच्याही डोक्याला दुखापत झाली. ,पोलिसांशी झालेल्या झटापटीत काही पैलवान जखमीही झाले असून रात्रभर हा गोंधळ सुरूच होता.
7/23

झालेल्या गोंधळानंतर आणि हाणामारीनंतर मध्यरात्री अॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली.
8/23

जखमी कुस्तीपटूंना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
9/23

स्टार खेळाडू बजरंग पुनिया आणि पोलीस यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओही आता समोर आला आहे.
10/23

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दारूच्या नशेत त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे.
11/23

घडलेल्या प्रकारानंतर, कुस्तीपटू विनेश फोगट रडताना दिसत आहे. कुस्तीपटू विनेश फोगट हिने घडल्या प्रकारासंदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
12/23

विनेश फोगटने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे.
13/23

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर पोलिसांनी जीवघेणा हल्ला केला असल्याचा आरोप फोगटने पत्रात केला आहे.
14/23

कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं शोषण केल्याचा गंभीर आरोप केलाय आणि या प्रकरणी अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचं जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे.
15/23

वरिष्ठ एसीपी धर्मेंद्र यांनी गैरवर्तन केल्याचाही आरोप विनेशने केला असून सर्व पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
16/23

कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये बजरंग पुनियाने काही मागण्या केल्या आहेत.
17/23

कुस्तीपटूंवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, वॉटरप्रूफ तंबू लावण्याची परवानगी द्या, अशाच काही मागण्या बजरंग पुनिया याने गृहमंत्री अमित शाहांकडे केल्या आहेत.
18/23

घडलेल्या प्रकारावर दिल्ली पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हा किरकोळ वाद असल्याचं पोलीस म्हणाले. जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान, आप नेते सोमनाथ भारती परवानगीशिवाय फोल्डिंग बेड घेऊन आंदोलनस्थळी आल्याचं पोलीस म्हणाले.
19/23

यानंतर पोलिसांनी अडवल्यावर आंदोलन करणारे कुस्तीपटू आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रकमधील बेड काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर किरकोळ बाचाबाची झाली आणि सोमनाथ भारती यांच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं.
20/23

कुस्तीपटूंनी त्यांच्या हरियाणातील लोकांना जंतरमंतरवर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. हरियाणातील सर्व शेतकर्यांना गुरुवारी सकाळपर्यंत दिल्लीत यावे, मिळेल ते ट्रॅक्टर, ट्रॉली घेऊन येथे पोहोचावे, असे आवाहन कुस्तीपटूंनी केले आहे.
21/23

पैलवानांचे आवाहन पाहून आता दिल्ली पोलीसही सतर्क झाले आहेत. जंतरमंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
22/23

हरियाणा आणि आसपासच्या भागातील अनेक शेतकरी आणि महिला दिल्लीला पोहोचू शकतात, त्यासाठी पोलीसही तयारी करत आहेत.
23/23

सध्या आंदोलनाच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
Published at : 04 May 2023 01:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















