एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 नं पाठवले चंद्राचे फोटो, 'चांदोमामा' जवळून दिसतो तरी कसा? तुम्हीच पाहा
Chandrayaan-3 Lunar Mission चांद्रयान-3 चा विक्रम लँडरने काढलेले फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. अवकाशातून चंद्र कसा दिसतो, हे यातून तुम्हाला दिसेल.
Chandrayaan 3 Moon Mission Update
1/8

इस्रोचं चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासह चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं.(PC:ISRO/twitter)
2/8

यासोबतच चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने अवकाशातून चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो आणि व्हिडीओ काढले असून ते इस्रोला पाठवले आहेत. (PC:ISRO/twitter)
3/8

लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर चंद्राचा पहिला फोटो समोर आला आहे.(PC:ISRO/twitter)
4/8

यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. (PC:ISRO/twitter)
5/8

चांद्रयान-3 10 जुलै रोली लँडरवर बसवलेल्या लँडर इमेजर (Lander Imager - LI) कॅमेरानं टिपलेले पृथ्वी आणि चंद्राचे काही फोटो पाठवले होते.(PC:ISRO/twitter)
6/8

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चंद्र मोहिम आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. (PC:ISRO/twitter)
7/8

चांद्रयान-3 चा विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर अंतरावर पोहोचलं असून आता याचा वेग कमी-कमी होत जाईल. त्यानंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. (PC:ISRO/twitter)
8/8

14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता चांद्रयान-3 एलव्हीएम-3 (LVM-3) रॉकेटद्वारे अवकाशात झेपावेल. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करेल.(PC:ISRO/twitter)
Published at : 18 Aug 2023 05:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















