एक्स्प्लोर

Jalna Crime: जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, येत्या काही दिवसांत आणखी काही आरोपींवरही अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jalna Crime: जालना जिल्ह्यात निवडणुकांचा काळ जवळ येत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून जिल्ह्यात एकापेक्षा अधिक गुन्हे करून दहशत पसरवणाऱ्या टोळ्या आणि वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारची कारवाई केलीय. जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावावर सुनावणी केल्यानंतर एकूण 11 आरोपींना जालना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत एक वर्षासाठी त्यांच्यावर ही हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांचे आदेश जारी केलेत. (crime News)

JalnaCrime: नेमके प्रकरण काय?

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी जवळील गोंदी आणि सिद्धेश्वर फाटा परिसरात हे आरोपी सक्रिय होते. गेल्या काही महिन्यांपासून या भागात वाळू चोरी, मारहाण, खंडणी आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनांची मालिका सुरु होती. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीच्या बेकायदेशीर कारवायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. या सर्वांविरुद्ध शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीदरम्यान या टोळ्यांकडून कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जालन्यातील पोलिसांकडून अजून काही गुन्हेगारांवर हद्दपारी आणि MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, येत्या काही दिवसांत आणखी काही आरोपींवरही अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस अधीक्षक बंसल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निवडणुकांचा काळ शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी.

हद्दपार झालेले आरोपी

किशोर प्रभु खराद, विकास सुरेश खराद, मनोज सुरेश खराद, ऋषीकेश विश्वंभर खराद, डिगांबर रघुनाथ शिंदे, आजीनाथ दत्ता शिंदे, अक्षय राजाभाऊ बाणाईत, सोपान दिनकर खराद, राहुल बळीराम खराद, गणेश कैलास मरकड आणि अवधुत दत्ता मिटकुल हे सर्वजण अंबड तालुक्यातील गोंदी व सिद्धेश्वर फाटा परिसरातील रहिवासी आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget