एक्स्प्लोर
आयआरसीटीसीचं अॅप आणि वेबसाईट 13 तासांनंतर सुरु, तांत्रिक बिघाड झाल्यानं लाखो प्रवाशांची गैरसोय
मंगळवारी पहाटे 3.30 वाजल्यापासून हा बिघाड सुरू झाला. याचा परिणाम मुंबईत देखील दिसून आला.
IRCTC
1/10

आयआरसीटीसीच्या अॅप आणि वेबसाईटवरून रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावे लागत होतं.
2/10

आयआरसीटीच्या सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली होती.
3/10

बुकींग सुरु झाल्यानं प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण निर्णाण झालंय.
4/10

मंगळवारी पहाटे 3.30 वाजल्यापासून हा बिघाड सुरू झाला. याचा परिणाम मुंबईत देखील दिसून आला.
5/10

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यूटीएस अॅपमधून तिकीट काढता आलं
6/10

यंत्रणेच्या फायरवॉलमध्ये तंत्रिक बिघाड झाल्याने आरक्षण यंत्रणा बंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
7/10

मात्र नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आयआरसीटीसी कॉर्पोरेट कार्यालयाचे म्हणणे आहे.
8/10

प्रवासी सुविधेकरीता ऑफलाइन आरक्षणसाठी अतिरिक्त तिकीट खिडकी सुरू करण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे
9/10

सध्या रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांच्या बुकिंगमध्ये IRCTC चा वाटा 80% आहे.
10/10

दरम्यान अनेक प्रवाशांनी त्यांचे पैसे कापले गेल्याचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत, मात्र तिकीट बुक केले जात नाही.
Published at : 25 Jul 2023 02:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























