एक्स्प्लोर
International Yoga day: देशभरातील वरिष्ठ नेत्यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन; पाहा फोटो...
International Yoga day: आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय. 21 जूनला संपूर्ण जग योगा दिवस उत्साहाने साजरा करते.या दिवशी योगाबद्दल सर्वांना जागरुक करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात.

International Yoga Day
1/12

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र (RBCC) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी योगासनं केली.
2/12

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवी दिल्लीतील संसद भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनं केली, संसद भवन संकुलात योग व्यायाम कार्यक्रमाचे नेतृत्व त्यांनी केले.
3/12

योग ही भारताने जगाला दिलेली एक अनोखी देणगी असल्याचे सांगून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी योग हा कोणत्याही विशिष्ट पंथाचा किंवा समूहाचा नाही, तर तो संपूर्ण मानवजातीचा अमूल्य वारसा आणि निरोगी जगाचा आधार आहे असे सांगितले.
4/12

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पुढे म्हणाले की, आजच्या बदलत्या परिस्थितीत जग आजाराकडून निरोगीतेकडे वाटचाल करत आहे आणि योग प्रत्येकाला त्यासाठी सक्षम करत आहे.
5/12

केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनं केली.
6/12

हरिद्वार येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी योगासनं केली.
7/12

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील गोरखपूरमधील योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात सहभाग घेतला, यावेळी त्यांनी विविध योगासनं केली.
8/12

योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले की, स्वस्थ शरीरासोबत स्वस्थ मनासाठी, निरोगी मनासाठी योगा करणं फायदेशीर ठरतं.
9/12

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील कोची येथे आयएनएस विक्रांतवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनं केली.
10/12

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार आणि इतरांसह कोची येथे आयएनएस विक्रांतच्या जहाजावर योगा करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
11/12

भारताच्या परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी नवी दिल्लीतील जुन्या किल्ल्यावर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनं केली.
12/12

नवी दिल्लीतील जुन्या किल्ल्यावर मीनाक्षी लेखी यांच्यासह इतर मंत्र्यांनी आणि परदेशी नागरिकांनी देखील योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासनं केली.
Published at : 21 Jun 2023 01:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
