हा थरारक खेळ खेळणाऱ्यांपेक्षा तो पाहणाऱ्यांनाच अनेकदा धडकी भरते. (सर्व छायाचित्रे- पीटीआय)
2/9
जल्लीकट्टूचा खेळ ऐन रंगात आलेला असताना...
3/9
राहुल गांधी यांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावणं राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चांना उधाण देऊन गेलं.
4/9
वायनाड मतदार संघातील खासदार असणाऱ्या राहुल गांधी यांची उपस्थिती या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरली.
5/9
राजकीय वर्तुळात राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यापेक्षाही जास्त त्यांच्या परदेशी दौऱ्यांमुळं आणि विविध कार्यक्रमांना असणाऱ्या उपस्थितीमुळं चर्चेत असतात.
6/9
जल्लीकट्टू स्पर्धा सुरु असतेवेळीच डीएमकेच्या युथ विंग सचिव Udhayanidhi Stalin राहुल गांधींशी चर्चा करताना.
7/9
सध्याही, अशाच एका कारणामुळं ते चर्चेत आले आहेत.
8/9
अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांना अनुसरून निशाणा साधणार, विरोधकांची रणनिती काय असणार याची चर्चा सुरु असतानाच राहुल गांधी मात्र एका वेगळ्याच कार्यक्रमात दिसून आले.
9/9
मदुराईतील अवनीयापूरम येथे आयोजित करण्यात आलेल्या जल्लीकट्टू स्पर्धेला त्यांनी हजेरी लावली होती.