एक्स्प्लोर
Chakrata Village: 'या' गावात परदेशी नागरिकांना बंदी; काय आहे यामागील कहाणी?
Chakrata Village: देशातील या सुंदर, शांत आणि प्रदूषणमुक्त गावाची लोकसंख्या खूपच कमी आहे. महत्त्वाचं म्हणजे, या गावात विदेशी नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Chakrata Village
1/7

Chakrata Village: आपला देश विविधतेनं नटलेला आहे, हे आपण अगदी गर्वानं सांगतो. अनेक सुंदर ठिकाण देशात आहेत. पण आपल्या देशात एक अत्यंत सुंदर गाव आहे. हे गाव उत्तराखंड राज्यात आहे. ज्याचं नाव 'चकराता' असं आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावात परदेशी लोकांना पूर्णपणे बंदी आहे.
2/7

चोहीकडे दाटलेली हिरवळ, धबधबे असं नैसर्गिक सुबत्तेनं हे गाव नटलेलं आहे. इथे नद्या आहेत आणि मनाला शांती देणारी शांतताही. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हे गाव पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असलं तरी इथे कोणीही विदेशी नागरिक जाऊ शकत नाहीत. एखाद्या परदेशी पर्यटकानं असं केलं तरी सिक्योरिटी फोर्समार्फत त्यांना रोखलं जातं.
3/7

इंग्रजांच्या काळात या गावात इंफेंट्री बेस असायचा. आता येथे इंडियन आर्मी कॅम्प आहे. त्यामुळे येथे परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी कोणत्याही विदेशी नागरिकानं घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाते.
4/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील महानगरांसोबतच अनेक ठिकाणं प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहेत. मात्र, या गावात प्रदूषण हे नावंही पोहोचलेलं नाही.
5/7

या सुंदर, शांत आणि प्रदूषणमुक्त गावाची लोकसंख्या खूपच कमी आहे. म्हणूनच येथे राहण्यासाठी फक्त निवडक हॉटेल्स उपलब्ध आहेत. या गावात टायगर फॉलसारखी आकर्षक पर्यटन स्थळं आहेत. इथे बसची सोय नाही. येथे असलेला 100 मीटर उंच धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला 6 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो.
6/7

चकरातापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिरमिरी येथे जाऊन तुम्ही सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात.
7/7

याशिवाय, येथे भारतीय लष्कराची एकमेव तिबेटी तुकडी आहे. जी भारत-चीन युद्धानंतर 1962 मध्ये तयार करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय लष्करासाठी या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं येथे परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
Published at : 09 Jan 2023 12:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
विश्व
विश्व
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
