एक्स्प्लोर
Chandrayaan-3 : चांद्रयान-3 उड्डाणाला 24 तास पूर्ण, चंद्राच्या कक्षेत पोहोचलं अंतराळयान, पुढील प्रवास कसा असेल?
Chandrayaan-3 Journey Updates : चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणाला 24 तास उलटून गेले आहेत. यानंतर आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे.
Chandrayaan-3 ISRO Lunar Mission
1/9

LVM 3-M4 रॉकेटने चांद्रयान-3 योग्य कक्षेत पोहोचवलं आहे. चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.
2/9

चांद्रयान-3 ने 14 जुलै रोजी यशस्वी उड्डाण केलं. यानंतर 40 दिवसांचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
3/9

आता चांद्रयान-3 चा पुढचा प्रवास कसा असेल, हे जाणून घ्या.
4/9

क्रायोजेनिक इंजिनासह चांद्रयान-3 पृथ्वीच्या बाह्य कक्षेत पोहोचलं आहे. हळूहळू चांद्रयान कक्षा आणि वेग वाढवत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.
5/9

चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. चांद्रयानमधील लँडरचं नाव 'विक्रम' आणि रोव्हरचं नाव 'प्रज्ञान' आहे.
6/9

विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.
7/9

चांद्रयान-2 च्या लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे.
8/9

चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल."
9/9

चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा खर्च सुमारे 75 कोटी आहे.
Published at : 15 Jul 2023 03:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम























