एक्स्प्लोर
PHOTO : फुलांनी सजलं 'बद्रीनाथ धाम'; 6 महिन्यांनी दरवाजे उघडले, दर्शनासाठी भाविकांची रिघ
Badrinath Dham
1/7

हिवाळ्यात बंद असलेले बद्रिनाथ धामाचे (Badrinath Dham) दरवाजे आज सकाळी 6 वाजता उघडले. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा बद्रिनाथमध्ये यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
2/7

कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
Published at : 08 May 2022 08:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























