एक्स्प्लोर
Vande Bharat Express : उत्तराखंडला मिळाली पहिली वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या सविस्तर
Vande Bharat Express : देशाला आणखी एक वंदे भारत मिळाली आहे. ही वंदे भारत ट्रेन उत्तराखंडसाठी धावेल. तर उत्तराखंडसाठी ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस आहे.

Vande Bharat Express
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. तर दिल्लीसाठी ही सहावी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे.
2/8

दिल्लीपासून अजमेर, वाराणसी, कटरा, भोपाळ आणि अंब अंदौरा या स्थानकावरुन ही वंदे भारत एक्सप्रेस धावेल.
3/8

उत्तराखंडसाठी ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. तर भारतातली ही 18वी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
4/8

हि रेल्वे डेहराडूनपासून दिल्ली आणि दिल्लीपासून डेहराडूनपर्यंत चालवण्यात येईल. ही प्रवाश्यांसाठी एक आरामदायी सुविधा असणार आहे.
5/8

आता दिल्ली ते डेहराडून हे अंतर 4 तास 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
6/8

तर ही वंदे भारत एक्सप्रेस 302 किमीचा प्रवास करेल. ही रेल्वे बुधवार सोडून आठवड्यातून सर्व दिवस धावेल.
7/8

दिल्ली ते डेहराडून या वंदे भारत तिकीटाचे दर 1,065 आणि 1890 रुपये असणार आहे.
8/8

ही वंदे भारत एक्सप्रेस आनंद विहार रेल्वे स्थानकावरुन संध्याकाळी 5.50 वाजता सुटेल आणि रात्री 10.53 मिनिटांनी डेहराडून रेल्वे स्थानकावर पोहचेल.
Published at : 25 May 2023 03:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
