एक्स्प्लोर
Dahi Handi 2025: ठाण्यात दहिहांडी उत्सव, मनसेकडून मराठी माणसासाठी खास आयोजन
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये "गोविंदा रे गोपाळा" आणि "जय बजरंग बली" अशा घोषणा ऐकू येत असून, दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.
Human pyramids
1/8

गोविंदा पथकांचा सज्ज दिमाख: विविध गोविंदा पथके मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.
2/8

ठाण्यात मानाच्या हंड्यांचे आयोजन: ठाणे शहरात अनेक प्रतिष्ठेच्या दहीहंड्या असतात आणि त्यापैकी मनसे नेता अविनाश जाधव यांच्या दहीहंडी उत्सवाकडे विशेष लक्ष वेधलं जातं आहे.
3/8

मराठी तरुणांसाठी व्यासपीठ: अविनाश जाधव म्हणाले की, “या खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून राज ठाकरे यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. हे तरुण पब संस्कृतीतले नाहीत, हे मराठी स्वाभिमानी युवक आहेत.”
4/8

सकाळपासून सुरू झालेला सलामी सोहळा: सकाळीच विविध गोविंदा पथके हंडीला सलामी देण्यासाठी उत्सवस्थळी दाखल होत आहेत.
5/8

काम आणि सराव यांचा समतोल राखणारी तरुणाई: जाधव यांनी सांगितलं की, हे तरुण दिवसभर काम करतात, पण महिनाभर संध्याकाळी सराव करून उत्सवासाठी स्वतःला तयार करतात — हा दिवस त्यांच्यासाठीच आहे.
6/8

कलाकारांऐवजी गोविंदांचा सन्मान: इतर नेत्यांच्या व्यासपीठावर कलाकार असले तरी, अविनाश जाधव यांच्या व्यासपीठावर फक्त गोविंदाचं कौतुक होतं — कलाकारांना लाखो रुपये देण्याऐवजी तो निधी गोविंदांमध्ये वाटल्यास त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, असं ते म्हणाले.
7/8

राज ठाकरे यांना निमंत्रण: जाधव यांनी सांगितले की, राज ठाकरे यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही आमंत्रण देण्यात आलं असून, ते आले तर तो दिवस खास ठरेल, नाही आले तरी 2016 साली दिलेल्या पाठिंब्यामुळे मंडळं त्यांच्या सन्मानार्थ सलामी देतात.
8/8

दरवर्षी 250 हून अधिक गोविंदा पथकांची हजेरी: ठाण्यातील या उत्सवात दरवर्षी सुमारे 250 गोविंदा पथके सहभागी होत असून, उत्सवाचा भव्यतेने आनंद घेतात.
Published at : 16 Aug 2025 05:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























