एक्स्प्लोर
PHOTO: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, बारा जणांचा मृत्यू;
Samriddhi Highway Accident : छत्रपती संभाजी नगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) मोठा अपघात झाला आहे.
Samriddhi Highway Accident
1/9

छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका परिसरातील समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 26 जण जखमी झाले आहेत.
2/9

एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
3/9

ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे.
4/9

ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. तर, कारवाई दरम्यान हा ट्रक अडवण्यात आल्याने त्याने अचानक ट्रक थांबवल्याने ट्रॅव्हल्स बस मागून येऊन धडकल्याची माहिती मिळत आहे.
5/9

या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते.
6/9

मात्र, छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाका परिसरातील समृद्धी महामार्गावर त्यांच्या ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला.
7/9

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
8/9

अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
9/9

तसेच, घटनास्थळी समृद्धी महामार्गावरील बचाव पथक, वैजापूर पोलीस देखील दाखल झाले होते. त्यानंतर गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, काही जखमींना वैजापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published at : 15 Oct 2023 08:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
भारत























