एक्स्प्लोर
Photo : शिक्षक संपावर गेल्याने गावकऱ्यांनीच भरवली शाळा, पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar: राज्यातील सरकारी कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपाची हाक दिली असून, शिक्षक देखील या संपात सहभागी झाले आहेत.

Photo : शिक्षक संपावर गेल्याने गावकऱ्यांनीच भरवली शाळा, पाहा फोटो
1/8

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
2/8

संपाला आठवडा उलटत आला तरीही याबाबत तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी सातव्या दिवशीही संपावर कायम आहे.
3/8

दरम्यान या संपामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) अनेक शाळा (School) बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
4/8

मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील गावकरी पुढे आले आहेत. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावकऱ्यांनीच शाळा भरवली आहे.
5/8

शिक्षक शाळेत आल्यावर संपामुळे वर्ग भरवत नाही. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी भग्गाव येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन, स्वतः शाळा भरवण्याचा निर्णय घेतला आहे
6/8

मुलांना शिकवण्यासाठी गावातील उच्चशिक्षित तरुण पुढे आले आहेत. या उच्चशिक्षित तरुणांनी शाळेत येऊन वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे.
7/8

संपामुळे शिक्षक शाळेत येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे.
8/8

त्यात परीक्षा तोंडावर असल्याने शाळा बंद असल्यास याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांचे संप संपेपर्यंत गावकरी शाळा भरवणार आहे.
Published at : 20 Mar 2023 04:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion