एक्स्प्लोर
रस्ता खराब असल्याने गावातील पोरांना कोणी मुली देईनात; लोकांनी केलं अनोखं आंदोलन; पाहा फोटो
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar News
1/9

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील मारोळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता खराब झाला आहे.
2/9

रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे झाल्याने पावसाचे पाणी तुंबत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
3/9

रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबत असल्याने, दुचाकी सोडा पायी चालणे देखील अवघड झाले आहे.
4/9

गावातून शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
5/9

रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे अनेकदा मोटर सायकल चिखलात अडकतात.
6/9

विशेष म्हणजे गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मुलांना मुली मिळत नसल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे.
7/9

रस्ता दुरुस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासन आणि नेतेमंडळीकडे मागणी केली. मात्र याचा कोणताही फायदा झाला नाही.
8/9

दरम्यान आज गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तुंबलेल्या पाण्याचे पूजन करून आगळवेगळे आंदोलन केलं.
9/9

ठाकरे गटाचे नेते मनोज पेरे यांच्यासह परिसरातील अनेक गावकरी यावेळी उपस्थित होते. तसेच रस्ता लवकर दुरुस्त न झाल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
Published at : 06 Jul 2023 06:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion