एक्स्प्लोर
Samrudhi Highway: समृद्धी महामार्गावर भलामोठा कंटेनर अडकला, पुलाखाली दबला; वाहनचालकांची कोंडी
Samrudhi Highway: बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली भलामोठा ट्रेलर अडकल्याने वाहतूक कोंडी झालाी. तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील धांदल उडाली
Samrudhi highway contener trap under bridge
1/8

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली भलामोठा ट्रेलर अडकल्याने वाहतूक कोंडी झालाी. तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील धांदल उडाली
2/8

अखेर, दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेला ट्रेलर बाहेर काढण्यात सर्वांन यश आले. त्यामुळे, इतर वाहनचालकांचा व ट्रेलरचालकाचा जीव भांड्यात पडला.
3/8

समृद्धी महामार्ग हा नेहमीच चर्चेत असलेला महामार्ग असून या घटनेमुळे एक लेनवरून वाहतूक दोन तास बंद ठेवावी लागली होती.
4/8

अपघात असो किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा असो, वेगवेगळ्या कारणाने समृद्धी महामार्ग हा नेहमीच चर्चेत असतो.
5/8

समृद्धी महामार्गावर आज मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळील चॅनेज 268 वर लोणी गवळी गावाजवळील पुलाखालून जाणारे एक भलं मोठं ट्रेलर जवळपास दोन तास अडकून पडलं होतं.
6/8

दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश मिळाले . यादरम्यान एक लेन वरून वाहतूक दोन तास बंद ठेवावी लागली.
7/8

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच व जड वाहनांमुळे समृद्धी महामार्गाच्या पुलांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
8/8

एका मालवाहतूक कंटेनर ट्रकमधून मोठा लोखंडी रोल समृ्द्धी महामार्गावरुन नेण्यात येत होता, त्यावेळी एका पुलाखाली तो कंटेनर अडकल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती
Published at : 12 Apr 2025 09:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























