एक्स्प्लोर
PHOTO : राजुरीत उलट्या छत्र्या धरून प्रसाद झेलण्याचाही अनोखी प्रथा
गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी काल्याचे किर्तन झाल्यावर पार पडतो विलोभनीय सोहळा.
beed rajuri
1/9

बीडच्या राजुरीमध्ये गणेश उत्सवाच्या पाचव्या दिवशी काला महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
2/9

राजुरी गावामध्ये मंगलमूर्ती गणेशाचं जागृत देवस्थान आहे, पूर्वीपासूनच राजुरी गावामध्ये पाच दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
3/9

काला महोत्सवाला पंचक्रोशीतून शेकडो भाविक गर्दी करत असतात.
4/9

पाचव्या दिवशी काल्याचा प्रसाद तयार करून तो मंदिराच्यावरून खाली उभ्या असलेल्या भक्तांच्या छत्र्यांमध्ये टाकला जातो.
5/9

हा प्रसाद झेलण्यासाठी पंचक्रोशीतील लोक छत्र्या सोबत घेऊन या कार्यक्रमात सहभागी होत असतात.
6/9

गेल्या अनेक वर्षांपासून राजुरीच्या ग्रामस्थांनी ही परंपरा जोपासली जाते.
7/9

आजच्या दिवशी राजुरीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं.
8/9

ज्वारीच्या लाह्या, दही, कोथिंबीर, भिजवलेली हरभरा डाळ यांपासून रुचकर असा काल्याचा प्रसाद बनवला जातो.
9/9

हाच काला भाविकांना त्यांच्या उलट्या छत्र्यात आजूबाजूच्या इमारतीवरून आणि मंदिरावरून टाकला जातो.
Published at : 04 Sep 2022 09:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























