एक्स्प्लोर
Beed : बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क उंटावरून साखर वाटली; पाहा फोटो
काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा मिळाला असून, मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली आहे.

Congress Celebration in Beed
1/9

त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळणार आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा (Congress Celebration) केला आहे.
2/9

मात्र, बीड (Beed) जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
3/9

कारण, राहुल गांधी यांना न्यायालयाने दिलासा दिल्याचे वृत्त येताच बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क उंटावरून 5 क्विंटल साखर वाटत आनंद साजरा केला आहे.
4/9

राहुल गांधींच्या बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
5/9

यावेळी बीड शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाजत गाजत रॅली काढण्यात आली.
6/9

तसेच फटक्यांची जोरदार आतिषबाजी, घोषणाबाजी करण्यात आली.
7/9

तसेच बीडच्या शहरवासियांना उंटावरून 5 क्विंटल साखर वाटण्यात आली.
8/9

ज्यात शहरातील नवा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट रोड गुरूवार पेठ ते माता श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आले.
9/9

image 9
Published at : 06 Aug 2023 01:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion