एक्स्प्लोर
बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरने एकास चिरडले, 8 ते 10 गाड्यांना धडक; संतप्त जमावाने कंटेनर जाळला
बीड जिल्ह्यातील केजमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून एका भल्यामोठ्या कंटनरने 8 ते 10 गाड्यांना धडक दिली. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कंटनेरच पेटवला आहे.
Beed container accident death
1/7

बीड जिल्ह्यातील केजमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून एका भल्यामोठ्या कंटनरने 8 ते 10 गाड्यांना धडक दिली. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कंटनेरच पेटवला आहे.
2/7

केजमध्ये कंटेनरने दिलेल्या धडकेत एकास चिरडले असून 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
3/7

केजहून अंबाजोगाईकडे येत असताना कंटेनरने लोखंडी सावरगावजवळ इतर गाड्यांना धडक दिल्याने अपघात घडला, त्यात 8 ते 10 गाड्यांना धडक देण्यात आली.
4/7

कंटेनरचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघातत एकाचा मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी असल्याची माहिती आहे.
5/7

अपघातातील जखमींवर केज व अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाड्यांना धडक दिल्यानंतर पुढे अंबाजोगाईजवळील लोखंडी सावरगाव जवळ हा कंटेनर पलटी झाला आहे.
6/7

अपघाताच्या घटनेनं जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे, कंटेनर पलटी झाल्यानंतर लोखंडी सावरगावजवळ संतप्त जमावाने कंटेनर पेटवला
7/7

दरम्यान, कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published at : 16 May 2025 05:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























