एक्स्प्लोर
Royal Enfield Bullet ची लोकांमध्ये क्रेझ; 'ही' आहेत कारणे
Royal Enfield Bullet ची लोकांमध्ये क्रेझ; 'ही' आहेत कारणे
1/5

Royal Enfield Bullet आपल्याकडे असावी असे अनेकांना वाटते. रॉयल एन्फिल्ड बुलेट खरेदी करण्याकडे अनेकांचा ओढा का आहे, याचा कधी विचार केलात का? रॉयल एन्फिल्ड बुलेट खरेदी करण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही कारणे आम्ही सांगणार आहोत.
2/5

रॉयल एन्फिल्ड बुलेट ही अनेकांनी status symbol (प्रतिष्ठेचे प्रतिक) म्हणून खरेदी केली आहे. ही बाईक आपल्याकडे असणे म्हणजे शानदार मोटारसायकल आणि भारदस्त व्यक्तिमत्व असणे असे समजले जाते.
3/5

या बुलेटमध्ये कस्टमाइजेशनला खूप वाव आहे. अनेकजण रॉयल एन्फिल्डला कस्टमाइज करून वापर करतात. काहीजण फक्त कस्टमाइज करता येईल म्हणून ही बुलेट खरेदी करतात आणि आपला 'स्वॅग' म्हणून त्याचा वापर करतात.
4/5

फक्त या दोन कारणांमुळे रॉयल एन्फिल्ड खरेदी केली जात नाही. ही बुलेट दीर्घकाळासाठी सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. ही बुलेट पिढ्यानपिढ्या तुम्हाला साथ देते. त्याशिवाय ही बुलेट मजबूत देखील असते.
5/5

रॉयल एन्फिल्ड चालवल्यानंतर इतर बाइकच्या तुलनेते कमी थकवा जाणवतो. ही मोटारसायकल बसण्यासाठीदेखील आरामदायी आहे. त्यामुळे तुम्ही लांबवरचा प्रवास सहज करू शकता.
Published at : 25 Dec 2021 12:37 PM (IST)
आणखी पाहा























