एक्स्प्लोर
हाय टेक फीचर्ससह Tvs Ntorq 125 Race Edition लॉन्च, किंमत आहे...

Tvs Ntorq 125 Race Edition
1/10

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने भारतात आपल्या Ntorq 125 Race Edition ला नवीन रंग पर्यायसह लॉन्च केले आहे. कंपनीनी आपली ही स्कूटर मरीन ब्लू रंगात लॉन्च केली आहे.
2/10

ही स्कूटर कंपनीने ब्लॅक, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक ब्लू अशा रंग पर्यायसह सादर केली आहे. चाल तर या स्कूटर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
3/10

मरीन ब्लू मधील नवीन TVS Ntorq 125 रेस एडिशनची किंमत रु.87,011 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. या नवीन स्कूटरसाठी TVS मोटर कंपनीच्या संपूर्ण भारतातील अधिकृत डीलरशिपवर बुकिंग सुरू झाली आहे.
4/10

स्टेल्थ विमानाच्या डिझाईनपासून प्रेरित TVS Ntorq 125 Race Edition ला सिग्नेचर LED टेल आणि हेडलॅम्प्ससह एका आक्रमक स्टाईल मिळतो.
5/10

स्कूटरवर 'रेस एडिशन' बॅजिंग देखील देण्यात आली आहे. स्कूटरला स्पोर्टी स्टब मफलर, टेक्सचर्ड फ्लोअरबोर्ड या स्कूटरला अधिक आकर्षक बनवतात.
6/10

TVS NTORQ 125 Race Edition TVS SmartXonnect सह येते. जे रायडरला त्यांच्या स्मार्टफोनला स्कूटरशी जोडण्यास मदत करते. यात अनेक स्मार्ट कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहे.
7/10

60 हून अधिक फीचर्ससह सुसज्ज असलेल्या संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरद्वारे ही स्कूटर ऍक्सेस केली जाऊ शकते. मिस्ड कॉल अलर्ट, मेसेज आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखी फीचर्स याच्या डिस्प्लेवर उपलब्ध आहेत.
8/10

स्कूटरमध्ये लास्ट पार्क केलेले लोकेशन असिस्ट, राइड स्टॅटिस्टिक्स आणि व्हॉईस असिस्ट सारखी फीचर्स देखील आहेत. जी 15 व्हॉईस कमांडला सपोर्ट करतात. स्कूटरला इंजिन-किल स्विच, पास-बाय स्विच आणि हाय-स्पीड अलर्ट देखील मिळतो.
9/10

TVS Ntorq 125 Race Edition मध्ये 124.8 cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 3-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड SOHC, फ्युएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे 7,000rpm वर 9.38 Bhp पीक पॉवर आणि 7,000rpm वर 10.5Nm पीक टॉर्क जनरेट करते.
10/10

रेस एडिशनचा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास आहे. ही स्कूटर फक्त 9 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडते.
Published at : 12 Sep 2022 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
भारत
बातम्या
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion