एक्स्प्लोर
स्मार्ट लूक, आधुनिक फीचर्स; 2024 मध्ये लॉन्च होणार महिंद्राची XUV.e9 इलेक्ट्रिक SUV
Mahindra XUV.e9
1/6

भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने लंडनमधील एका मेगा इव्हेंटमध्ये आपल्या आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. यातच कंपनीच्या नवीन XUV.e9 आणि XUV.e8 या आधुनिक इलेक्ट्रिक कारही कंपनीने पहिल्यांदाच सादर केल्या आहेत. या कार विना पेट्रेल आणि डिझेलवर धावणाऱ्या XUV 700 ची SUV कूप व्हर्जन आहे.
2/6

एका खास डिझाइनमध्ये सादर करण्यात आलेल्या XUV.e9 चा फक्त इलेक्ट्रिक व्हर्जन कंपनी बाजारात आणणार आहे. महिंद्राच्या म्हणण्यानुसार या इलेक्ट्रिक कारची रचना आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक कार XUV 700 पेक्षा मोठी आणि लांब आहे. ज्याची लांबी 4,790 मिमी, रुंदी 1,905 मिमी आणि उंची 1,690 मिमी आहे. याच्या समोरील बाजूस असलेला मोठा C आकाराचा हेडलॅम्प याच्या लुकमध्ये भर घालतो.
Published at : 17 Aug 2022 11:12 PM (IST)
आणखी पाहा























