एक्स्प्लोर
येत आहे Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कार, फीचर्स मिळणार दमदार
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/0774d2767695c35ac208b89f173ed85e1668363437630384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
hyundai electric car
1/10
![भारतात इलेक्ट्रिक कारची वाढती बाजारपेठ पाहा आता Hyundai Motor ही सक्रिय झाली आहे. कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली दुसरी इलेक्ट्रिक कार उतरणार आहे. या कारचे नाव आहे Hyundai Ioniq 5.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/aeee1985a5bc109285d1b6ee7849920ecf42b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात इलेक्ट्रिक कारची वाढती बाजारपेठ पाहा आता Hyundai Motor ही सक्रिय झाली आहे. कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली दुसरी इलेक्ट्रिक कार उतरणार आहे. या कारचे नाव आहे Hyundai Ioniq 5.
2/10
![कंपनी भारतात आपल्या इलेक्ट्रिक सेगमेंट पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. ही EV लॉन्च करणार असल्याचे सांगणात कंपनीने म्हटले आहे की, नवीन EV E-GMP प्लॅटफॉर्म आधारित असणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/9178fbc5e50c47b8adaa420ab1070550b52cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनी भारतात आपल्या इलेक्ट्रिक सेगमेंट पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. ही EV लॉन्च करणार असल्याचे सांगणात कंपनीने म्हटले आहे की, नवीन EV E-GMP प्लॅटफॉर्म आधारित असणार आहे.
3/10
![Ioniq 5 ही Hyundai ची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. जी या प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. Kia ची पहिली इलेक्ट्रिक कार EV6 सारखेच फीचर्स यात मिळतील, अशी चर्चा आहे. कंपनीने अधिकृतपणे देशात Ionic 5 लॉन्च करण्याची तारीख जाहीर केलेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/df099172d38371d7de79e1e33316e81f7120a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ioniq 5 ही Hyundai ची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. जी या प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. Kia ची पहिली इलेक्ट्रिक कार EV6 सारखेच फीचर्स यात मिळतील, अशी चर्चा आहे. कंपनीने अधिकृतपणे देशात Ionic 5 लॉन्च करण्याची तारीख जाहीर केलेली नाही.
4/10
![जानेवारीत दिल्लीत होणाऱ्या आगामी ऑटो एक्सपोमध्ये याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/5fbb2258375618dcf1b5630689e8bd607f408.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जानेवारीत दिल्लीत होणाऱ्या आगामी ऑटो एक्सपोमध्ये याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.
5/10
![Hyundai Motor ने यापूर्वी घोषणा केली होती की, ते 2028 पर्यंत भारतात 6 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. ही कार देशात CKD मॉडेल म्हणून लॉन्च केली जाईल आणि फर्मच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (e-GMP) आधारित असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/f376eed5567811f8f02cb42dc0e132eb786d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hyundai Motor ने यापूर्वी घोषणा केली होती की, ते 2028 पर्यंत भारतात 6 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. ही कार देशात CKD मॉडेल म्हणून लॉन्च केली जाईल आणि फर्मच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (e-GMP) आधारित असेल.
6/10
![अलीकडेच कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर आगामी मॉडेल म्हणून Ionic 5 इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली होती. Hyundai ने यापूर्वी सांगितले होते की, EV 2022 च्या उत्तरार्धात देशात लॉन्च केली जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/5086e55cb8c707f68b316631442bfda301de3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर आगामी मॉडेल म्हणून Ionic 5 इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली होती. Hyundai ने यापूर्वी सांगितले होते की, EV 2022 च्या उत्तरार्धात देशात लॉन्च केली जाईल.
7/10
![नवीन Ionic 5 फ्यूचरिस्टिक डिझाइनमध्ये येणार आहे. जी इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा खूप वेगळी दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/23678ed59023393855610c92a13f940d859bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन Ionic 5 फ्यूचरिस्टिक डिझाइनमध्ये येणार आहे. जी इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा खूप वेगळी दिसते.
8/10
![यामध्ये चौकोनी डीआरएलसह त्याचे एलईडी हेडलॅम्प, 20-इंच एरोडायनामिक-डिझाइन केलेले अलॉय व्हील, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, पिक्सेलेटेड एलईडी टेललाइट्स सारखे फीचर्स देण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/b55d9878d520a2c0604cc18a16b4361455d40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये चौकोनी डीआरएलसह त्याचे एलईडी हेडलॅम्प, 20-इंच एरोडायनामिक-डिझाइन केलेले अलॉय व्हील, फ्लश-फिटिंग डोअर हँडल, पिक्सेलेटेड एलईडी टेललाइट्स सारखे फीचर्स देण्यात येणार आहे.
9/10
![कारच्या आत डॅशबोर्डवर एक मोठा कन्सोल, इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी प्रत्येकी एक सिंगल स्क्रीन देण्यात येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/4fb2353185e52845a266cda4e485a7b6dee1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कारच्या आत डॅशबोर्डवर एक मोठा कन्सोल, इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी प्रत्येकी एक सिंगल स्क्रीन देण्यात येईल.
10/10
![केबिन हायलाइट्समध्ये दोन-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील, दुसऱ्या रांगेसाठी अॅडजस्टेबल सीट आणि स्लाइडिंग सेंटर कन्सोल यांचा समावेश आहे. इंटरनॅशनल-स्पेक मॉडेलला रियर व्हील ड्रायव्हिंग किंवा सर्व व्हील ड्रायव्हिंग कॉन्फिगरेशनमध्ये 58 kW आणि 72.6 kW बॅटरी पॅक मिळू शकतो. भारतीय बाजारपेठेत कोणता पॅक सादर केला जाईल, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/13/25f19e5cdc727771b4c7e6f3f4cee3ec5e47f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केबिन हायलाइट्समध्ये दोन-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील, दुसऱ्या रांगेसाठी अॅडजस्टेबल सीट आणि स्लाइडिंग सेंटर कन्सोल यांचा समावेश आहे. इंटरनॅशनल-स्पेक मॉडेलला रियर व्हील ड्रायव्हिंग किंवा सर्व व्हील ड्रायव्हिंग कॉन्फिगरेशनमध्ये 58 kW आणि 72.6 kW बॅटरी पॅक मिळू शकतो. भारतीय बाजारपेठेत कोणता पॅक सादर केला जाईल, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
Published at : 13 Nov 2022 11:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)