एक्स्प्लोर
Harley Davidson X440 : या Harley बाईकला मिळतेय ग्राहकांची पसंती; 25,000 हून अधिक झाली बुकिंग
Harley Davidson X440 : Hero MotoCorp ने म्हटले आहे की, Harley X440 च्या टेस्टिंग राईड्स 1 सप्टेंबरपासून सुरू होतील
Harley Davidson X440
1/6

Harley Davidson X440: Harley-Davidson X440 बाईक हीरो मोटोकॉर्पच्या सहकार्याने भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार करण्यात आली आहे. कंपनीने सध्या काही काळ बुकिंग थांबवले आहे.
2/6

Harley-Davidson ने नुकत्याच लाँच झालेल्या X440 बाईकसाठी बुकिंग बंद केली आहे. लॉन्च झाल्यापासून, कंपनीला X440 साठी आतापर्यंत 25,597 बुकिंग मिळाले आहेत. हार्ले डीलर्सनी अधिकृतपणे 4 जुलैपासून 5,000 रुपयांमध्ये बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
3/6

Hero MotoCorp ने म्हटले आहे की, Harley X440 च्या टेस्टिंग राईड्स 1 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि वितरण ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. Hero MotoCorp नीमराना, राजस्थान येथे Harley-Davidson X440 चे उत्पादन करेल. बुकिंगच्या तारखांनुसार डिलिव्हरी प्राधान्याने केली जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
4/6

अधिकृत निवेदनात, कंपनीने सांगितले की, प्रास्ताविक एक्स-शोरूम किंमती सुधारित केल्या गेल्या आहेत. डेनिम, विविड आणि एस ट्रिम्सची किंमत आता अनुक्रमे 2,39,500, 2,59,500 आणि 2,79,500 रुपये असेल. बुकिंग विंडो पुन्हा सुरु झाल्यावर नवीन किंमती प्रस्तावित केल्या जातील.
5/6

Harley-Davidson X440 ला एअर-/ऑइल-कूल्ड, 440cc, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते, जे 6,000rpm वर 27hp आणि 4,000rpm वर 38Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
6/6

Harley-Davidson X440 ची स्पर्धा Royal Enfields आणि अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Triumph Speed 400 शी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीड 400 लाही जवळपास 20,000 बुकिंग मिळाले आहेत.
Published at : 12 Aug 2023 02:23 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























