एक्स्प्लोर
Hyundai आणि Kia घेऊन येत आहे जबरदस्त एसयूव्ही, 13 एप्रिल रोजी होणार सादर

4
1/6

2022 Hyundai Palisade 13 एप्रिल रोजी आपल्या जागतिक प्रीमियरसाठी सज्ज आहे. आगामी Hyundai Palisade SUV चे न्यूयॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये अनावरण केले जाणार आहे.
2/6

Hyundai च्या US अधिकृत वेबसाईटने जारी केलेल्या टीझरनुसार, Hyundai Palisade फेसलिफ्टमध्ये एक मोठा ग्रिल, LED हेडलॅम्प आणि नवीन बंपर देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त Palisade SUV खालच्या पुढच्या बंपरवर तसेच बाजूच्या स्कर्टवर कॉन्ट्रास्ट इन्सर्ट देते.
3/6

आतील बाजूस Hyundai Palisade च्या अपग्रेडमध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो-डिमिंग साइड मिरर, हायड्रोफोबिक विंडो, हायवे ड्रायव्हिंग असिस्ट 2.0 आणि पूर्ण-डिस्प्ले रीअरव्ह्यू मिरर यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, SUV रिव्हर्स AEB, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रिमोट स्मार्ट पार्क असिस्ट, टो मोड आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहे.
4/6

तांत्रिकदृष्ट्या 2022 Hyundai Palisade दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल. ज्यात 2.2-लीटर टर्बो-डिझेल इंजिन आणि 3.8-लीटर V6 पेट्रोल इंजिनचा समावेश असेल. पहिले 200 PS पॉवर आणि 440 Nm टॉर्क जनरेट करेल, तर पेट्रोल इंजिन 295 PS पॉवर आणि 355 Nm पीक टॉर्क जनरेट करेल.
5/6

हे 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल. याच दरम्यान Palisade SUV मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आणखी काही पर्याय मिळतील की नाही, हे Hyundai ने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.
6/6

लॉन्च झाल्यावर Hyundai Palisade ची स्पर्धा Kia Telluride फेसलिफ्टशी होईल. 13 एप्रिल रोजी न्यूयॉर्क इंटरनॅशनल मोटर शोमध्ये नेक्स्ट-जेन टेलुराइडचे अनावरण देखील केले जाईल.
Published at : 11 Apr 2022 11:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion