एक्स्प्लोर
Best Off Road Bikes: ऑफ रोड राईडिंगसाठी बेस्ट आहेत 'या' 5 बाईक्स; पाहा फोटो
Best sport Bikes: तुम्ही स्वत:साठी सर्वोत्तम ऑफ रोड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे काही पर्याय उत्तम ठरतील.

Off Road Bikes
1/5

या यादीत पहिलं नाव Hero XPulse 200 4V स्पोर्ट्स बाईकचं आहे, तिचे 220mm ग्राउंड क्लीयरन्स तिची ऑफ-रोडिंग क्षमता वाढवण्याचं काम करते. ही बाईक एक्स-शोरूम 1.44 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते.
2/5

दुसऱ्या क्रमांकावर येते KTM 390 अॅडव्हेंचर स्पोर्ट बाईक, जी 300 सीसी इंजिनसह येते. बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. तसेच, त्याचा मागील मोनोशॉक 10 स्टेप्सपर्यंत नेला जाऊ शकतो. या बाईकची सुरुवातीची किंमत 3.38 लाख रुपये आहे.
3/5

या यादीतील तिसरी स्पोर्ट्स बाईक Moto Morini X-Cape 650X ही आहे, जी 650 cc इंजिनसह येते. या बाईकमध्ये तुम्ही विंड स्क्रीन आणि त्यात असलेले USD फॉर्क्स देखील समायोजित करू शकता. पाच रंगांच्या पर्यायांसह, ही बाईक 7.20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केली जाऊ शकते.
4/5

Suzuki V Strom SX ही देखील एक उत्तम स्पोर्ट्स बाईक आहे. ही 249cc इंजिनसह येते. तसेच उत्तम नियंत्रणासाठी ब्लूटूथ वैशिष्ट्यासह डिजिटल कन्सोल आणि ड्युअल चॅनल ABS सारखी नवीनतम वैशिष्ट्यं आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत 2.11 लाख रुपये आहे.
5/5

Royal Enfield 411 ही स्पोर्ट बाईक देखील उत्तम आहे. 411 सीसी इंजिनसह येणाऱ्या या बाईकमध्ये लाँग राईडसाठी चांगलं सस्पेंशन मिळतं. यात टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ड्युअल चॅनल एबीएस सारखी वैशिष्ट्ये आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.16 लाख रुपये आहे.
Published at : 01 Aug 2023 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
