एक्स्प्लोर
PHOTO : औरंगाबादमध्ये बसवली 'कोरोना भगाव मशीन', पालिकेने खर्च केले लाखो रुपये

कोरोना भगाव मशीन
1/6

औरंगाबाद पालिकेने तब्बल 20 लाख खर्च करत 'कोरोना भगाव यंत्र' अशी एक नवी मशीन बसवली आहे. या मशीनचं नाव आयन डोम, असं आहे.
2/6

पालिकेत आयुक्त यांच्या कार्यालयापासून प्रत्येक अधिकारी आणि आरोग्य केंद्रात ही मशीन बसवण्यात आली आहे.
3/6

पालिकेने एक मशीन 6 हजार 499 रुपयांना खरेदी केली आहे. अशा 300 मशीन पालिकेने खरेदी केल्या आहेत, त्यामुळे या मशीन बसवण्यासाठी पालिकेने जवळपास 20 लाख रुपये खर्च केले आहेत.
4/6

एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आता औरंगाबाद पालिकेने हे यंत्र आणल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
5/6

या इतक्या मोठ्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तसंच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली जात आहे.
6/6

याशिवाय कर्मचाऱ्यांना या मशीनचा फायदा होणार का? हे देखील पाहावं लागेल.
Published at : 16 Feb 2022 05:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
