Sachin Pilgaonkar On Trollers: 'टीकाकारांनो...'; ट्रोलर्सना सचिन पिळगावकरांचं सडेतोड उत्तर, आढेवेढे न घेता, जे काय ते सांगून टाकलं
Sachin Pilgaonkar On Trollers: अगदी बालपणापासूनच इंडस्ट्रीत सक्रिय असलेले सचिन पिळगावकर अनेक मुलाखतींमध्ये बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीसंदर्भात अनेक किस्से सांगतात. तसेच, आपली मतंही मांडत असतात.

Sachin Pilgaonkar On Trollers: मराठी मनोरंजनविश्वात (Marathi Industry) 'महागुरू' म्हणून ओळखले जाणारे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgounkar) म्हणजे, सिनेसृष्टीतलं मोठं नाव. मराठी असो वा हिंदी, सचिन पिळगांवकरांनी आपल्या अभिनयानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडवं. सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदी (Hindi Movie) आणि मराठीत (Marathi Movie) अनेक सिनेमे केले.
अगदी बालपणापासूनच इंडस्ट्रीत सक्रिय असलेले सचिन पिळगावकर अनेक मुलाखतींमध्ये बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीसंदर्भात अनेक किस्से सांगतात. तसेच, आपली मतंही मांडत असतात. पण, अनेकदा ते यामुळे जोरदार ट्रोल होतात. आतापर्यंत अनेक कलाकरांनी सचिन पिळगावकरांची बाजू घेऊन ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय. अशातच आता खुद्द सचिन पिळगावकरांनी ट्रोलर्सना उत्तर देत सर्वांची बोलती बंद केली आहे.
ट्रोलर्सना उद्देशून महागुरू काय म्हणाले?
मराठी अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले की, "मुळात ट्रोल करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहिती नसेल तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही... करिअरच्या 62 व्या वर्षी मी त्यांना इतका महत्त्वाचा वाटत असेल, लोकप्रिय असेन तर आजवर मी जे काही कमावलं, ती परमेश्वराची कृपा आहे..."
"कदाचित ट्रोलर्सना मी त्यांचा वयाचा वाटतो म्हणून ते टीका करतात. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याची मला जाणीव आहे. मी काम करत राहणार. टीकाकारांनो तुमचं भलं व्हावं, असा आशीर्वाद देईन.", असंही सचिन पिळगांवकर म्हणाले आहेत.
दरम्यान, 'नदिया के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले. तर, 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय. सध्या त्यांच्या अनुभवांचे किस्से सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























