एक्स्प्लोर
तूप की तेल? रोज स्वयंपाकात काय वापरावं?
oil vs ghee : प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं काहींना तूप पचतं, तर काहींना तेल अधिक योग्य ठरतं. आपल्या पचनशक्ती, वय, व्यायाम आणि जीवनशैलीनुसार तूप आणि तेल यांचं योग्य प्रमाण ठरवावं.
oil vs ghee
1/11

तूप हे भारतीय आहारात पूर्वीपासून वापरलं जातं. आयुर्वेदानुसार, तूप पचनास मदत करतं, आणि वात-पित्त दोष शांत करतं. शुद्ध गायीचं तूप मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. रोजच्या जेवणात थोडंसं तूप पौष्टिक ठरतं.
2/11

तेल अनेक प्रकारचं असतं – शेंगदाणा, सूर्यफूल, तिळाचं, खोबरेल, ऑलिव्ह इत्यादी. प्रत्येक तेलाचे वेगवेगळे पोषणमूल्य असतात. आपल्या हवामानानुसार आणि शरीराच्या गरजेनुसार योग्य तेल निवडणं महत्त्वाचं आहे. एका प्रकारचं तेल सातत्याने वापरणं टाळावं.
3/11

तूप जरी चरबीयुक्त असलं, तरी योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यदायी ठरतं. थोडंसं तूप वरण, भात, पोळीवर घेतल्यास चवही वाढते आणि पचनशक्तीही सुधारते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी ते उपयुक्त आहे.
4/11

जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्यास हृदयविकार, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. दररोजचा आहार तेलकट असेल, तर दीर्घकाळ शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अति तेलाचा वापर टाळणं आवश्यक आहे.
5/11

तूप जास्त करून उकडलेले किंवा शिजवलेले पदार्थ जसं की खिचडी, वरण, पोळी यामध्ये वापरावं. तेल भाज्या, परतणं किंवा सौम्य तळणासाठी योग्य असतं. डीप फ्रायसाठी जास्त ताप सहन करू शकणारं तेल वापरावं.
6/11

तूप उच्च तापमानावर सहज जळतं आणि त्याचे पोषणमूल्य नष्ट होतं. त्यामुळे डीप फ्रायसाठी ते योग्य नाही. त्याऐवजी शेंगदाणा किंवा तिळाचं तेल वापरावं, जे उच्च तापमान सहन करू शकतं.
7/11

तूप आणि तेल दोन्ही शरीरासाठी आवश्यक असले, तरी त्याचा वापर प्रमाणात करणे फार महत्त्वाचं आहे. सातत्याने एकाच प्रकारचं तेल वापरणं आरोग्यासाठी घातक असू शकतं. दर काही आठवड्यांनी तेल बदलत राहणं हे शरीरासाठी हितकारक आहे.
8/11

तुपातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स हे मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतात. त्वचेच्या आरोग्यासाठीही तूप फायदेशीर आहे. थंड हवामानात तूप सांधेदुखी कमी करतं आणि शरीराला उष्णता पुरवतं.
9/11

घरी बनवलेलं शुद्ध गायीचं तूप केमिकल्सपासून मुक्त असतं. ते सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे. बाजारात मिळणाऱ्या रिफाइन्ड तुपाच्या तुलनेत घरगुती तूप चवदार आणि नैसर्गिक असतं.
10/11

प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं काहींना तूप पचतं, तर काहींना तेल अधिक योग्य ठरतं. आपल्या पचनशक्ती, वय, व्यायाम आणि जीवनशैलीनुसार तूप आणि तेल यांचं योग्य प्रमाण ठरवावं.
11/11

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 04 Aug 2025 12:25 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















