एक्स्प्लोर
Health Care : सतत थकवा जाणवतोय? कारण असू शकतं व्हिटॅमिन B12 ची कमतरता!
Health Care : सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यास, ते व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेचे लक्षण असू शकते, त्यामुळे रक्त तपासणी करून योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
Health Care
1/9

बर्याच लोकांना रात्री गाढ झोप येते, पण तरीही सकाळी थकवा जाणवतो. हे समस्या फक्त झोपेची नाही, तर शरीरातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळेही होऊ शकते.
2/9

दिवसभर आळस येणे, अशक्तपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे. हे लक्षणे वारंवार दिसत असल्यास ती दुर्लक्षित करू नयेत ती पुढे गंभीर ही ठरू शकतात.
3/9

अशी स्थिती व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे होऊ शकते. हे व्हिटॅमिन शरीरातील ऊर्जा, रक्तपेशी आणि मज्जासंस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक असते.
4/9

B12 कमी झाल्यास त्याची काही लक्षण आहेत जसे कि चक्कर येणे, डोकेदुखी, विसरणे, मूड स्विंग्स आणि हातपाय सुन्न होणे.
5/9

मांस, मासे, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे व्हिटॅमिन B12 चे चांगले स्रोत आहेत.
6/9

शाकाहारी लोकांनी फोर्टिफाइड दूध आणि सोया मिल्क किंवा तृणधान्ये याचा आपल्या आहारात समाविष्ट करावा.
7/9

जर तुम्हाला व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची शंका वाटत असेल, तर रक्त तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण योग्य निदान आणि उपचारांमुळे शरीरातील ऊर्जा पुनर्संचयित होऊन आरोग्य सुधारते.
8/9

वेळीच उपचार घेतल्यास थकवा कमी होतो आणि मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारते.
9/9

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 12 Nov 2025 04:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























