सण म्हणलं की स्त्रियांची पहिली पसंती असते ती दागिन्यांना, दागिन्यांचे कितीही वेगवेगळे प्रकार आले तरी सोन्याचे पारंपरिक दागिने अजूनही स्त्रीयांच्या मनावर राज्य करतात.. चला तर दसऱ्यानिमित्त पारंपरिक दागिन्यांवर नजर टाकूया..
2/7
तोडे : स्त्रियांचा आवडता दागिना म्हणजे तोडे.. कोणत्याही रंगाच्या बांगडयापुढे तोडे घातले की हात अगदी उठून दिसतात..
3/7
ठुशी: मराठमोळा, पारंपरिक पण मॉडर्न टच असलेला हा दागिना महिलावर्गाची खास पसंती असतो.. नाजूक पण ठसठशीत ठुशी प्रत्येकाच्या कलेक्शन मध्ये असायलाच हवी..
4/7
नथ : मराठी स्त्री म्हणलं की नथ ही आठवतेच, सध्या बाजारात उपलब्ध असलेली हिऱ्याची, खड्याची नथ ही पारंपरिक मोत्याच्या नथीपुढे फिकी पडते..
भोर माळ : दोन पदरी, तीन पदरी भोर माळ आजही ट्रेंड मध्ये असते, सध्या ट्रेंड मध्ये असलेली oxidise भोर माळ स्त्रियांचं खास आकर्षण ठरतायत.. (सर्व फोटो : सोशल मीडिया)