एक्स्प्लोर
Depression : झोप पूर्ण होऊनही सतत थकवा जाणवतोय? कारण जाणून व्हाल थक्क
Depression : थकवा मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. यामुळे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पोषक द्रव्यांचे सेवन करणं गरजेचं आहे.
Depression
1/11

आजकालच्या जीवनशैलीत स्ट्रेस आणि मानसिक थकवा मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. अनेक लोक सतत चिडचिडे आणि थकलेले वाटू लागतात.
2/11

अनेकांना दिवसभर मेंटली ड्रेन्ड वाटतं. यामागे त्यांची अस्वस्थ आणि अनियमित जीवनशैलीही कारणीभूत ठरू शकतं.
3/11

डॉक्टर थकवा दूर करण्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. काही लोक पूर्ण झोप घेऊनही दिवसभर थकलेलेच वाटतात.
4/11

असा थकवा इतर अनेक कारणांमुळेही निर्माण होऊ शकतात.
5/11

योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पोषक द्रव्यांचे सेवन करणे गरजेचे असते. यामुळे इम्यून सिस्टम मजबूत राहते आणि ऊर्जा टिकून राहते
6/11

शरीरात आयरनची कमतरता झाली तर हिमोग्लोबिन कमी तयार होते. हिमोग्लोबिन कमी झाल्याने पेशींना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही.
7/11

यामुळे शरीराला सतत थकवा जाणवू लागतो. डिहायड्रेशन देखील थकव्याचे एक मोठे कारण असते.
8/11

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची हालचाल आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी कमी पिल्याने थकवा, चक्कर आणि डोकेदुखी होऊ शकते.
9/11

स्ट्रेस हा थकवा आणि चिडचिडेपणाचा सर्वात मोठा कारण मानला जातो. स्ट्रेसमुळे शरीर आणि मेंदू दोन्ही सतत हाय अलर्टवर राहतात.
10/11

ताणामुळे चिंता आणि उदासीनता वाढून झोपेची गुणवत्ता कमी होते. मोबाइल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरची ब्ल्यू लाइट मेंदूला सतत जागे राहण्याचा सिग्नल देते आणि झोपेचा र्हिदम बिघडवते.
11/11

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 18 Nov 2025 11:58 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























