एक्स्प्लोर
फ्रिजमध्ये कांदा, लसूण ठेवणं योग्य का चुकीचं? जाणून घ्या कारण!
कांदा आणि लसूण हे बहुतेक घरात फ्रिजमध्ये ठेवले जातात… पण खरंच हे बरोबर आहे का? त्यांच्या चवीवर, टेक्स्चरवर आणि पोषणावर त्याचा परिणाम होतो का? जाणून घ्या महत्त्वाची माहिती!
कांदा आणि लसूण
1/9

फ्रिजमध्ये कांदा आणि लसूण ठेवणं अनेकांना सुरक्षित वाटतं, पण प्रत्यक्षात ते त्यांच्या गुणवत्तेसाठी हानिकारक ठरतं
2/9

फ्रिजमध्ये आर्द्रता जास्त असल्याने कांद्याच्या लेअरमध्ये थेट ओलावा शोषला जातो आणि त्यामुळे कांदा पटकन सॉफ्ट होतो, पाणी सोडतो आणि त्याचं टेक्स्चर पूर्ण बदलतं.
3/9

शिवाय कांद्याचा तीव्र सुगंध फ्रिजमधील इतर पदार्थांत मिसळून जातो.
4/9

लसूण देखील थंड तापमान सहन करू शकत नाही,
5/9

फ्रिजमध्ये ठेवलेलं लसूण काही दिवसांत अंकुरते, कडू चव देते आणि ओलाव्यामुळे बुरशीही येऊ शकते.
6/9

या दोन्ही पदार्थांना हवेशीर, कोरड्या आणि प्रकाश कमी असलेल्या जागेतच उत्तमरीत्या टिकवता येतं.
7/9

पँट्री, स्टोअर कॅबिनेट किंवा विणलेल्या बास्केटमध्ये ठेवले तर कांदा-लसूण ताजे राहतात, चव टिकते आणि त्यांचा शेल्फ-लाईफही वाढतो
8/9

त्यामुळे फ्रिजमध्ये त्यांना जागा देण्यापेक्षा योग्य वातावरणात साठवणूक करणंच आरोग्यासाठी आणि चवीसाठी अधिक योग्य ठरतं.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 17 Nov 2025 01:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























