एक्स्प्लोर
Rakshabandhan 2024 : रक्षाबंधनाला बहिणीला करा खुश! 'या' साड्या Gift म्हणून द्या, बहिण-भावाचं नातं होईल घट्ट
Rakshabandhan 2024 : प्रत्येक भाऊ-बहीण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. विशेषत: बहिणींसाठी हा दिवस खूप खास आहे. त्यासाठी ती अनेक दिवसांपासून तयारी करू लागते.
Rakshabandhan 2024 Gift Ideas lifestyle marathi news
1/8

रफल साडी - जर तुम्हाला तुमच्या बहिणीला वेगळी डिझायनर साडी भेट द्यायची असेल, तर या प्रकारची रफल साडी हा उत्तम पर्याय आहे. रफल साडी प्रत्येकाला शोभून दिसते. अशात तुम्ही विचार न करता तुमच्या बहिणीला अशी साडी भेट देऊ शकता. यासोबतच मॅचिंग ज्वेलरीही भेट द्या.
2/8

बांधणी प्रिंट साडी - जर तुमच्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले असेल, तर तिला सामान्य साडी देण्याऐवजी पारंपारिक बांधणी साडी भेट द्या. बांधणी प्रिंट साडी नवीन नववधूंवर खूप सुंदर दिसते. तुम्हाला बांधणी साडी ऑनलाइन तसेच ऑफलाइन कमी किमतीत मिळेल.
3/8

शिफॉन साडी - सध्या उन्हाळा असल्याने प्रत्येक स्त्रीला शिफॉनची साडी नेसणे आवडते. शिफॉनची साडीही खूप सुंदर दिसते. अशात जर तुम्ही तुमच्या बहिणीला शिफॉनची साडीही गिफ्ट करू शकता. या साड्या खूप हलक्या आहेत, म्हणून ते नेसण्यास सोप्या आहेत.
4/8

सिक्विन साडी - जर तुमच्या बहिणीला वेस्टर्न लुक कॅरी करायला आवडत असेल, तर तिच्यासाठी सिक्विन वर्कची साडी खरेदी करा. अशी सिक्विन साडी तुमच्या बहिणीचा लूक वाढवेल. अशा प्रकारच्या साड्यांचाही सध्या ट्रेंड आहे
5/8

organza साडी - ऑर्गेन्झा साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. अशात तुम्ही तुमच्या बहिणीला ऑर्गेन्झा फॅब्रिकची साडी गिफ्ट करू शकता. त्याचा लूकही परिधान केल्यावर खूप छान वाटतो. ते खरेदी करताना तुमच्या बहिणीचा आवडता रंग लक्षात ठेवा.
6/8

सिल्क साडी - सिल्क साडी सदाबहार असते. तुमची बहीण प्रत्येक कार्यक्रमात हे सहजपणे नेसू शकते. रक्षाबंधनला जर तुम्ही तिला सिल्कची साडी भेट दिली. तर यात तुम्हाला अनेक प्रकार आढळतात. ज्यामध्ये बनारसी, कांजीवरम आणि मुंगा सिल्क आहे.
7/8

असे कोणतेच भाऊ-बहिण नसतील, जे भांडत नसतील, हे खरं तर भांडण नसतेच, हे या नात्यातील गोड प्रेम असते. जेव्हा रक्षाबंधन सण येतो, तेव्हा तुम्हाला त्यांच्यातील प्रेम दिसेलच. प्रत्येक भाऊ-बहीण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. विशेषत: बहिणींसाठी हा दिवस खूप खास आहे. त्यासाठी ती अनेक दिवसांपासून तयारी करू लागते. यंदा हा सण 19 ऑगस्टला म्हणजेच सोमवारी साजरा होणार आहे.
8/8

राखी बांधल्यानंतर प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला एक सुंदर भेटवस्तू देतो. जर तुमच्या बहिणीला साडी नेसायला आवडत असेल, तर तुम्ही तिला एक सुंदर साडी भेट देऊ शकता. येथे आम्ही तुम्हाला सहा सर्वोत्कृष्ट आणि सुंदर साड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या परिधान केल्याने तुमची बहीण सर्वात सुंदर दिसेल.
Published at : 08 Aug 2024 04:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























