एक्स्प्लोर
Kesar For Skin : चला जाणून घेऊया चेहऱ्यावर केशर लावल्याने कोणते फायदे होतात?
केशर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.

Skin Care: Saffron
1/9

चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, सुरकुत्या अशा समस्या असतील तर त्यामागे सर्व सौंदर्य झाकून जाते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करून पाहू शकतो.
2/9

जर तुम्हाला त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर बनवायची असेल तर केशर वापरणे खूप फायदेशीर आहे. केशर त्वचेच्या अनेक समस्या दूर करून चेहरा उजळतो. चला जाणून घेऊया चेहऱ्यावर केशर लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे.
3/9

क्रीममध्ये केशर मिसळून लावल्याने टॅनिंग दूर होईल आणि चेहरा चमकदार दिसेल. रात्री केशर मिसळून क्रीम लावा आणि सकाळी पाण्याने धुवा.
4/9

आठवड्यातून किमान 2-3 वेळा हे करून पाहिल्यास चेहऱ्यावर चमक दिसेल.
5/9

तुळशीसोबत केशर लावल्याने त्वचेसाठी खूप फायदा होतो. यामध्ये असलेले गुणधर्म मुरुमांची समस्या दूर करतात. तुळशीच्या पानांसोबत केशर बारीक करून पेस्ट बनवा. काही वेळ चेहऱ्यावर ठेवा, कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हे करून पाहिल्यास अनेक फायदे होतील.
6/9

खोबरेल तेलात केशर लावल्याने त्वचा निस्तेज होते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. केशर रात्रभर भिजत ठेवा, त्यात थोडे खोबरेल तेल आणि एक चमचा दूध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 20-25 मिनिटांनी चेहरा धुवा.
7/9

दूध आणि चंदनात केशर मिसळून फेस पॅक बनवू शकता.
8/9

दूध आणि चंदन पावडर एकत्र करून त्यात केशर घाला. ही पेस्ट काही वेळ तशीच राहू द्या, कोरडी झाल्यावर धुवा. यामुळे सुरकुत्याची समस्या दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोण तेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (photo:/unsplash.com/)
Published at : 19 Jan 2023 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
राजकारण
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
