एक्स्प्लोर
How to Fix Your Mood : खराब मूड चटकीसरशी होईल बरा... फक्त 'हे' 7 उपाय करून पाहा
How to Fix You Mood : अनेकदा आपल्याला काही नकारात्मक गोष्टींमुळे आपला मूड खराब होतो. यामुळे इतर कामांवरही परिणाम होतो.

How to Fix You Mood
1/9

मूड खराब असण्याचा अर्थ असा नाही की, आपण दिवसभर दुःखी आणि निराळ राहावं. काही उपाय करून तुम्ही तुमचा मूड चुटकीसरशी ठीक करु शकता.
2/9

तुमचा मूड खराब असेल तर थोडा वेळ उन्हात फिरा. यामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते, ज्यामुळे तुमचा मूड सुधारण्यास खूप मदत होते.
3/9

अनेक वेळा तुम्ही अशा नकारात्मक वातावरणात राहिल्यावर आणि नकारात्मक लोकांचं ऐकून तुमचा मूड खराब होतो. अशा वेळी सतत हसतात आणि विनोदी स्वभाव असणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. त्यांची विनोदबुद्धीमुळे तुमची नकारात्मक विचारापासून सुटका होईल. सकारात्मक लोकांसोबत बसून तुम्ही चांगले विचार करता आणि त्यामुळे तुमचा मूडही ठीक होतो.
4/9

ऑफिसमध्ये किंवा घरात एखाद्या गोष्टीमुळे तुमचा मूड खराब झाला असेल तर तुम्ही तुमचे आवडते गाणे ऐकू शकता. यामुळे तुमचा वाईट मूड चांगला होण्यास मदत होऊ शकते.
5/9

गाणं किंवा तुमच्या आवडीचं संगीत ऐकून, मेंदू त्याच्या हार्मोन डोपामाइनचे उत्पादन वाढवू शकतो. याचा तुमच्या न्यूरोलॉजिकल परिणाम होऊन हा मूड सुधारण्यास मदत होऊ शकते.
6/9

तुमचा मूड खराब असेल तेव्हा तुम्ही व्यायाम करण्याचा पर्यायही निवडू शकता. तुमच्या मेंदूला याचा खूप फायदा होऊ शकतो. व्यायाम केल्याने मेंदूमध्ये एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात ज्यामुळे तुमचा मूड सुधरते.
7/9

मूड ठीक करण्यासाठी चॉकलेट खाणं हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन तयार होऊन आपला मूड सुधारतो. त्यामुळे चॉकलेटचा खाऊन तुम्ही तुमचा मूड ठीक करू शकता.
8/9

अनेकदा एखाद्या गोष्टीमुळे मूड खराब होतो. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुमचा मूड खराब असेल तेव्हा एकटे राहण्याऐवजी तुमच्या मित्रांना भेटा.
9/9

यासोबतच कुटुंबातील सदस्याशी बोला. इतरांना तुमची समस्या सांगा, असं केल्यानं तुमचं मन हलकं होईल आणि तुमचा मूड चांगला होईल.
Published at : 18 Jun 2023 02:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
