एक्स्प्लोर
खबरदार ! सतत मोबाईलमध्ये डोक खूपसून राहाल, तर होऊ शकतो हाय ब्लड प्रेशरचा आजार
एका संशोधनातून असं आढळून आलं आहे की, ज्यांना मोबाईलवर एका आठलड्यामध्ये 30 मिनिटापेक्षा जास्त बोलायची सवय आहे त्यांना ब्लड प्रेशरचा आजार होण्याचा धोका जास्त असतो.
![एका संशोधनातून असं आढळून आलं आहे की, ज्यांना मोबाईलवर एका आठलड्यामध्ये 30 मिनिटापेक्षा जास्त बोलायची सवय आहे त्यांना ब्लड प्रेशरचा आजार होण्याचा धोका जास्त असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/31fa6fded35c2e4e0dea6731db3690821683379402663704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mobile Phone Impact On Health : ( ABP Majha )
1/10
![सध्या बहुतांश व्यक्तींच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर अनेकजण मोबाईलमध्ये डोक खूपसून बसलेले असतात. हे चित्र शाळा, कॉलेज, घरी आणि सार्वजनिक ठिकाणी दिसून येतं. इतकं लोक मोबाईलला चिकटलेले असतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/8278aaeb52a76fa4a8dc0dc32681c853bceed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या बहुतांश व्यक्तींच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर अनेकजण मोबाईलमध्ये डोक खूपसून बसलेले असतात. हे चित्र शाळा, कॉलेज, घरी आणि सार्वजनिक ठिकाणी दिसून येतं. इतकं लोक मोबाईलला चिकटलेले असतात
2/10
![मग तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत सहज गप्पा मारताना, ऑफिसमध्ये काम करताना अनेकांना मोबाईल वारंवार डोकावून पाहायची सवय असते. या सवयीचं व्यसनात रूपांतर झालं, तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/be2bcb67f921a02d889a32783c90b52c02f2f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मग तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत सहज गप्पा मारताना, ऑफिसमध्ये काम करताना अनेकांना मोबाईल वारंवार डोकावून पाहायची सवय असते. या सवयीचं व्यसनात रूपांतर झालं, तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो
3/10
![आज शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरूण आणि मध्यम वयोगटातील सर्वांना मोबाईलचं प्रचंड व्यसन जडलं आहे. यातील अनेकांना दिवस-रात्र मोबाईल पडिक राहण्याची वाईट सवय लागलेली असते. अशा सवयीचे गुलाम असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला मोबाईलवर प्रमाणाबाहेर बोलायची सवय असेल,तर हाय ब्लड प्रेशरच्या आजाराला बळी पडू शकतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/661d235720961d095300c04f02255751a1db6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरूण आणि मध्यम वयोगटातील सर्वांना मोबाईलचं प्रचंड व्यसन जडलं आहे. यातील अनेकांना दिवस-रात्र मोबाईल पडिक राहण्याची वाईट सवय लागलेली असते. अशा सवयीचे गुलाम असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला मोबाईलवर प्रमाणाबाहेर बोलायची सवय असेल,तर हाय ब्लड प्रेशरच्या आजाराला बळी पडू शकतात
4/10
![तुम्हाला सतत मोबाईलवर पडिक राहायची सवय असेल, तर ही सवय लवकर बदलायला हवी. एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, ज्यांना मोबाईलवर एका आठलड्यामध्ये 30 मिनिटापेक्षा जास्त बोलायची सवय आहे त्यांना ब्लड प्रेशरचा आजार होण्याचा धोका वाढतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/d7981d78b9b8a061d0eb19691b8d4c6fcbd6f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला सतत मोबाईलवर पडिक राहायची सवय असेल, तर ही सवय लवकर बदलायला हवी. एका संशोधनात असं आढळून आलं आहे की, ज्यांना मोबाईलवर एका आठलड्यामध्ये 30 मिनिटापेक्षा जास्त बोलायची सवय आहे त्यांना ब्लड प्रेशरचा आजार होण्याचा धोका वाढतो
5/10
![जर तुम्हाला प्रत्येक आठवड्यात 30 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त बोलायची सवय असेल, तर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशनचा आजार होण्याचा धोका 12 टक्क्यांनी वाढतो. आपण युज करत असलेल्या मोबाईल फोनमधून रेडिएशन बाहेर पडतात. यामुळे अनियंत्रित रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर वाढतो,असं संशोधनातून समोर आलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/35023a5f7aba14663de855e9e74d61fafbffc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला प्रत्येक आठवड्यात 30 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त बोलायची सवय असेल, तर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशनचा आजार होण्याचा धोका 12 टक्क्यांनी वाढतो. आपण युज करत असलेल्या मोबाईल फोनमधून रेडिएशन बाहेर पडतात. यामुळे अनियंत्रित रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर वाढतो,असं संशोधनातून समोर आलं आहे
6/10
![एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशर झाल्यामुळे ह्रदय विकाराचा आजार होऊ शकतो आणि ह्रदय विकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो. यावर चीनमधील सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जितकं जास्त मोबाईलवर बोलाल, तितकं जास्त तुमच्या ह्रदयावर परिणाम होतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/af45fe5207f00f4308cdc9c7a21a129e42e3b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशर झाल्यामुळे ह्रदय विकाराचा आजार होऊ शकतो आणि ह्रदय विकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो. यावर चीनमधील सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जितकं जास्त मोबाईलवर बोलाल, तितकं जास्त तुमच्या ह्रदयावर परिणाम होतो
7/10
![याचा अभ्यास करण्यासाठी युके बायोबँकच्या डाटाचा घेण्यात आला होता. या अभ्यासामध्ये 37 वर्षापासून ते 73 वर्षाच्या 2 लाख 12 हजार 46 इतक्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांना विचारण्यात आलं की, तुम्हा सगळ्यांना मोबाईलवर किती उशिरापर्यंत बोलायची सवय आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/1123247138aba95860d7403252bfa95384462.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचा अभ्यास करण्यासाठी युके बायोबँकच्या डाटाचा घेण्यात आला होता. या अभ्यासामध्ये 37 वर्षापासून ते 73 वर्षाच्या 2 लाख 12 हजार 46 इतक्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांना विचारण्यात आलं की, तुम्हा सगळ्यांना मोबाईलवर किती उशिरापर्यंत बोलायची सवय आहे
8/10
![या संशोधनातून असं समोर आलं की, जी लोक आठवड्यातून एकदा मोबाईलवर बोलतात, त्यांच्यात ब्लड प्रेशरचा धोका 7 टक्क्यांनी वाढला आहे. अशा सहभागी लोकांची संख्या 13 हजार 984 इतकी होती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/fd66cdadd6fbc6012195c5561d771fbd72c1c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संशोधनातून असं समोर आलं की, जी लोक आठवड्यातून एकदा मोबाईलवर बोलतात, त्यांच्यात ब्लड प्रेशरचा धोका 7 टक्क्यांनी वाढला आहे. अशा सहभागी लोकांची संख्या 13 हजार 984 इतकी होती
9/10
![तसेच ज्या लोकांनी प्रत्येक आठवड्यामध्ये मोबाईलवर 30 मिनिट किंवा त्यापेक्षा मिनिटे बोलायची सवय असेल, तर ब्लड प्रेशरचा धोका 12 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय हाय ब्लड प्रेशरची लक्षणेही दिसून आली आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/9903daa06a6a8a0f7436c8cc739f164cbb7d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच ज्या लोकांनी प्रत्येक आठवड्यामध्ये मोबाईलवर 30 मिनिट किंवा त्यापेक्षा मिनिटे बोलायची सवय असेल, तर ब्लड प्रेशरचा धोका 12 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय हाय ब्लड प्रेशरची लक्षणेही दिसून आली आहेत
10/10
![या संशोधनात असं सांगण्यात आले की,मोबाईल फोनच्या वापरामुळे स्त्री-पुरूष या दोघांवर एकसारखाचं परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे नेहमी एक सल्ला दिला जातो की, लोकांनी स्मार्टफोनचा कमीत कमी वापर करावा. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळू शकतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/06/aadea6cd2f4c73fc9dba54893d44c759ea10a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संशोधनात असं सांगण्यात आले की,मोबाईल फोनच्या वापरामुळे स्त्री-पुरूष या दोघांवर एकसारखाचं परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे नेहमी एक सल्ला दिला जातो की, लोकांनी स्मार्टफोनचा कमीत कमी वापर करावा. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळू शकतं.
Published at : 06 May 2023 06:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)