एक्स्प्लोर
Health Tips : बहुगुणी फणसाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
jackfruit
1/9

फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते.
2/9

फणसामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने ज्यांना कॉन्स्टिपॅशनचा किंवा पोट साफ न होण्याचा त्रास आहे त्यांनी फणसाची भाजी किंवा फणसाचे गरे आवर्जून खावेत.
3/9

अल्सरचा त्रास असलेल्या रुग्णांनी फणस जरूर खा. यात असणाऱ्या नैसर्गिक घटकांमुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येण्यास मदत होते.
4/9

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी फणस खाणे उपयुक्त आहे. कारण फणसात असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
5/9

फणसातील फायबर्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो.
6/9

हिमोग्लोबिन कमी असलेल्यानी फणस जरूर खावा. कारण फणसात लोहाचे भरपूर प्रमाण असते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
7/9

फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते. त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.
8/9

फणसात प्रोटीन्ससुद्धा भरपूर असते. त्यामुळे शारीरिक दुर्बलता कमी होऊन मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 01 May 2022 07:37 PM (IST)
आणखी पाहा























