एक्स्प्लोर
Health Tips : चालण्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर जाणून घ्या हा योग्य मार्ग !
Health Tips : काही लोकांना चालल्यानंतर पाय, कंबर दुखीची तक्रार असते, ज्यामुळे ते चालल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतात. जर तुम्हाला अशा समस्येला बळी पडायचं नसेल तर चालताना काही गोष्टी लक्षात ठेवा,

Health Tips (Photo Credit : pexels )
1/11

फिट राहण्यासाठी चालणे हा खूप चांगला व्यायाम आहे. जर तुम्ही व्यायाम करू शकत नसाल तर दररोज 15-20 किमी चालून तुम्ही एकंदर फिटनेस राखू शकता, पण कधी कधी काही लोकांना चालल्यानंतर पाय, कंबर दुखीची तक्रार असते, ज्यामुळे ते चालल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतात. जर तुम्हाला अशा समस्येला बळी पडायचं नसेल तर चालताना काही गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या त्यांच्याविषयी.(Photo Credit : pexels )
2/11

चालताना मान सरळ पुढे ठेवा. खाली किंवा उजव्या-डावीकडे पाहू नका. नेहमी समोरच्याकडे पाहून चालण्याचा प्रयत्न करा. तसेच चालताना हनुवटी थोडी खाली झुकलेली असावी.(Photo Credit : pexels )
3/11

पोट आतल्या बाजूला खेचता आलं तर चांगलं. खांद्याची हालचाल अधिक व्हायला हवी. चालताना पाठ सरळ ठेवा. पुढे किंवा मागे झुकू नका.(Photo Credit : pexels )
4/11

हात मोकळे करा, त्यांना स्वत: हलू द्या. कोपरापासून हात वाकवले तरी ते अधिक चांगले.तसेच पायाची बोटे, टाच, गुडघे सक्रिय राहतील अशा प्रकारे चालावे.(Photo Credit : pexels )
5/11

वॉकिंग, जॉगिंग नेहमी चप्पल न घालता शूज घालून करावे. कपडे सैल आणि हवेशीर असावेत. घट्ट फिटेड कपडे घालू नका. पोश्चर अबाधित ठेवणारी स्पोर्ट्स ब्रा घाला. खूप घट्ट अंडरगारमेंट्स परिधान केल्याने हर्निया होऊ शकतो.(Photo Credit : pexels )
6/11

जर तुम्ही पहिल्यांदाच चालायला सुरुवात करत असाल तर पाय, विशेषत: पाय ताणायला विसरू नका.(Photo Credit : pexels )
7/11

लक्षात घ्या चालतांना फक्त सरळ चालत जा. चालताना तुम्ही संगीत ऐकू शकता. इयरफोन घाला. त्यावर वेगवान किंवा हळू वाटेल असे संगीत ऐका. यामुळे मनाला आराम मिळतो, पण रस्त्यावरून चालताना गाणं ऐकू नका, हे धोकादायक ठरू शकते .(Photo Credit : pexels )
8/11

चालताना तोंडातून श्वास घेण्याची पद्धत तुम्हाला लवकर थकवू शकते. त्याचबरोबर तोंड कोरडे पडू लागते, पुन्हा पुन्हा तहान लागते. फुफ्फुसांबरोबरच संपूर्ण शरीराला ऑक्सिजन नीट मिळत नाही, तसेच फुफ्फुसांपर्यंत धूळ पोहोचते.(Photo Credit : pexels )
9/11

फोनवर बोलताना फिरू नका. यामुळे चालण्याचे फायदे कमी होतात, कारण शरीर आणि मन यांच्यात समन्वय असणे महत्वाचे आहे.(Photo Credit : pexels )
10/11

जर खूप थंडी किंवा खूपगर्मी असेल तर चालणे टाळा, यामुळे स्ट्रोकचा धोका असू शकतो. त्याचबरोबर हिवाळ्यात न्यूमोनिया आणि दम्याची ही तक्रार होऊ शकते. त्याचबरोबर टाच ताणणे टाळा. पायाच्या बोटांवर भर दिला तर बरे, अन्यथा गुडघ्यात दुखू शकते.(Photo Credit : pexels )
11/11

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 11 Feb 2024 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
