एक्स्प्लोर
Summer Superfood : 'हे' सुपरफूड खा आणि उन्हाळ्यातही कूल राहा!
उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच काही सुपरफूडबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुमचे पोटही थंड राहिल, तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही निरोगीही राहाल.
Summer Superfood
1/9

उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.
2/9

दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शरीराची लाही लाही होत आहे. अशा हवामानात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
3/9

या ऋतूमध्ये पोटाच्या समस्या जास्त होतात. उन्हाळ्यात तोलून मापून अन्न खावं लागतं. तळलेले पदार्थ थोडेसे खाल्ले तरी त्याचा परिणाम जाणवू लागतो.
4/9

अशा परिस्थितीत तुम्हाला अशाच काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने तुमचे पोटही थंड राहिल, तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही निरोगीही राहाल. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
5/9

उन्हाळ्यात बरीच हंगामी फळं बाजारात विकली जातात, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही कलिंगड, द्राक्षे, संत्री, खरबूज यासारखे फळे खा. यामुळे तुम्ही हायड्रेट राहाल आणि तुमचे पोटही थंड राहिल.
6/9

उन्हाळ्यात कोशिंबीर भरपूर खा. काकडी, झुकिनी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खा. या भाज्यांमध्ये पोट थंड राहते आणि तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. काकडीमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पोट व्यवस्थित राहतं. काकडी खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
7/9

उन्हाळ्यात तुम्ही नारळाचे पाणी जरुर प्यावे, त्यात इलेक्ट्रोलाईट्स असतात, ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करु शकतात. तसंच पोट थंड ठेवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये थंडावा असतो ज्यामुळे उष्माघातापासून संरक्षण होते.
8/9

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात दहीचं सेवन अवश्य करा. दही हा प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे जो आतडे निरोगी राखण्यात मदत करु शकतो. तसेच पोट थंड आणि शांत राहण्यास मदत होते.
9/9

उन्हाळ्यात तुमच्या जेवणात पुदिन्याच्या चटणीचा नक्कीच समावेश करा. त्यामुळे पोट थंड ठेवण्यास मदत होते. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तरीही पुदिन्याची चटणी पोट शांत ठेवण्यास मदत करते.
Published at : 13 Apr 2023 01:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























