एक्स्प्लोर
Headache Remedies: अवघ्या काही मिनिटांतच दूर पळेल डोकेदुखी, ‘हे’ उपाय नक्की ट्राय करा!

Headache
1/6

लोकांना अनेकदा चुकीच्या आहारामुळे किंवा तणावामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे अनेकांचा दिनक्रम देखील विस्कळीत होतो. मात्र, काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. जाणून घ्या या घरगुती उपायांबद्दल...
2/6

गरम पाणी आणि लिंबू : कधी कधी शरीरात गॅस तयार झाल्यामुळेही डोकेदुखी सुरू होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू मिसळा. हे पाणी घोट घोट प्या.
3/6

सफरचंद आणि काळे मीठ : हा देखील एक उत्तम घरगुती उपाय मानला जातो. एक सफरचंद घ्या आणि त्याचे तुकडे करा. आता त्यावर काळे मीठ भुरभुरून खा. गॅसची समस्या दूर करण्यासाठीही काळे मीठ गुणकारी मानले जाते.
4/6

लवंग : डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगाचा वास घेणे देखील चांगले मानले जाते. यासाठी तव्यावर लवंग भाजून, ती रुमालात बांधून त्याची पुरचुंडी बनवा. याचा वास घेत राहा. यामुळेही काही मिनिटांत डोकेदुखी दूर होऊ शकते.
5/6

तुळस आणि आले : या दोन्ही गोष्टी रस काढून कपाळावर लावल्यानेही डोकेदुखी कमी होते. तुम्ही हा रस पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. ही घरगुती रेसिपी देखील प्रभावी ठरेल.
6/6

लेमन टी : लिंबू आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी लिंबूयुक्त चहा पिणे देखील चांगले आहे. यासाठी कोऱ्या चहामध्ये अर्धा लिंबू पिळून प्या. याने डोकेदुखीच्या समस्येवर मात करता येते. (कोणत्याही उपायापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Published at : 30 Jan 2022 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
