Heat Stroke : उन्हाळ्यात उष्माघाताची समस्या ही खूप सामान्य आहे. याला उष्माघात (Suntroke) असेही म्हणतात.
2/8
सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरु आहे. वाढत्या उन्हाच्या तापमानात अनेक शारीरिक समस्याही उद्भवू लागतात. अशातच निर्माण होणारी आणखी एक सम्साया म्हणजचे उष्माघात. उष्माघात म्हणजे काय? उष्माघातानंतर काय होते? तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना उष्माघात झाल्यास कसे ओळखावे? आणि यावर उपचार नेमके काय? असे अनेक प्रश्न चिंता निर्माण करतात. कारण उष्माघात ही हंगामी समस्या असू शकते. पण, त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. सर्वप्रथम, उष्माघाताची लक्षणे जाणून घ्या.
3/8
उष्माघातानंतर शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही आणि तापमान सतत वाढत जाते, शरीराचे तापमान वाढल्यानंतरही घाम येत नाही, सतत मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात, त्वचेवर लाल खुणा, पुरळ दिसू शकतात, हृदयाचे ठोके जलद होतात. यांसारखी लक्षणं जाणवतात.
4/8
थंड वातावरणातून किंवा अचानक एसी रूममधून कडक सूर्यप्रकाशात येणे, उन्हात जास्त वेळ घालवणे, कडक उन्हाळ्यात जास्त व्यायाम करणे, शरीरातील गरजेपेक्षा पाणी कमी होणे. यामुळे उष्माघाताची समस्या उद्भवते.
5/8
उष्माघात झाल्यास हे उपाय करावे. सर्व प्रथम थंड ठिकाणी झोपा. पण एसी जास्त वेगाने चालू करू नका. शरीराला श्वास घेऊ द्या. ओल्या कपड्याने शरीर हलकेच पुसून घ्या. आपला श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करा आणि ताजे पाणी प्या. इलेक्ट्रॉल द्रावण, लिंबूपाणी पिणे सर्वात फायदेशीर आहे. त्यानंतर थोडावेळ ओला टॉवेल डोक्यावर ठेवा म्हणजे मेंदू शांत होईल. शरीराचे तापमान नियंत्रणात आल्यावर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. उलट्या-पोटदुखी झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
6/8
कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाणे टाळा. काही कारणास्तव घराबाहेर पडलाच तर लिंबूपाणी पिऊन बाहेर जा. द्रवपदार्थांचे वारंवार सेवन करा. जसे की, नारळ पाणी, लिंबूपाणी, थंड दूध इ.
7/8
सोडा, कोल्ड ड्रिंक, चहा आणि कॉफी यांपासून शक्यतो दूरच राहा. हे शरीरातील पाण्याची पातळी कमी करतात. सुती कपडे वापरा. उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर करा. पाण्याची बाटली कायम स्वत:बरोबर ठेवा.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.